दिल्ली | शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने टी२०मधील ६०००वी धाव पुर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो ५वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
२९० टी२० सामन्यात २६२ डावात १०९वेळा नाबाद रहात त्याने ६००७ धावा केल्या आहेत. ३८.५०च्या चांगल्या सरासरीने धावा जमवताना त्याने २४ अर्धशतके केली आहेत. त्याला एकही शतक टी२० मध्ये आजपर्यंत करता आलेले नाही.
शुक्रवारी अर्थात १८ मे रोजी धोनीने हा टप्पा पार केला. तर बरोबर २ वर्षांपुर्वी याच दिवशी १८मे २०१६ला विराट कोहलीने ४००० हजार धावांचा टप्पा आयपीएलमध्ये पार केला होता.
सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट ४९४४ धावांसह अव्वल स्थानी आहे. धोनी ३९९१ धावांसह ८व्या स्थानी आहे.
सध्या कोहलीच्या नावावर टी२०मध्ये २४१ सामन्यात ७६२१ धावा आहेत. टी२०मध्ये कमीतकमी ३५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंमध्ये कोहलीची सरासरी ही ४१.१९ ही सर्वोत्तम आहे. तर यामध्ये धोनी कोहली, शेन माॅर्श आणि ख्रिस गेलनंतर चौथ्या स्थानी आहे.
६००० धावांचा टप्पा पार करणारा तो जगतील १८वा खेळाडू आहे. तर विराट कोहली हा टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ७वा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–थोडं उशीरा, पण धोनीने केला हा भीमपराक्रम आपल्या नावे!
–त्या फलंदाजाची आयपीएलमधील एक धाव पडली ७ लाख रुपयांना
–रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!
–गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब
–तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर
–ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली