मुंबई । नव्या दमाचा 19 वर्षांखालील पाकिस्तान संघातील फलंदाज हैदर अलीने आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. आपल्या फलंदाजीच्या शैलीने त्याने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या 9 सामन्यात 239 धावा कुटल्या. 19 वर्षाखालील झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आणि पाकिस्तान सुपर लीगमधील दमदार प्रदर्शनामुळे त्याची राष्ट्रीय संघात ‘एंट्री’ झाली आहे. नुकतीच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संघात निवड झाली आहे.
हैदर अली भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला आदर्श खेळाडू मानतो. प्रसारमाध्यमांशी मुलाखत देताना तो म्हणाला, “भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माला मी आदर्श मानतो. तो खूप चांगला खेळाडू आहे. त्यांच्यासारखी आक्रमक खेळी मला करायची आहे.”
हैदर अली रोहितचे कौतुक करताना म्हणाला, “रोहितने अर्धशतक ठोकले की, शतकाचा विचार करतो. शतक पूर्ण झाल्यानंतर दीड शतक अथवा द्विशतक करण्याचा विचार करतो. रोहित सारखीच मोठमोठी खेळी करण्याची माझी इच्छा आहे. खरोखरच तो एक मॅचविनर खेळाडू आहे.” हैदर अलीने यापूर्वीदेखील रोहित शर्माचे कौतुक केले होते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि समालोचक रमीज राजा देखील हैदरची फलंदाजी पाहून खूपच प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले, ” हैदर अलीमध्ये विराट कोहली आणि बाबर आझम सारखे टॅलेंट आहे. हैदरला आपल्या फलंदाजीत सातत्य ठेवण्याची गरज आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी –
सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण; वहिनीचा अहवाल पॉझिटिव्ह
२०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स? श्रीलंकेने सुरु केली चौकशी
२४ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला