नुकत्याच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. भारताने पाहुण्या वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केले आहे. यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अंती भारतीय संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. यानंतर आता सोमवारी (२१ फेब्रुवारी) श्रीलंकेच्या निवड समितीने त्यांचा १८ सदस्यीय संघ (Sri Lanka 18 Members T20 Squad) जाहीर केला आहे.
श्रीलंकेच्या टी२० संघाचे नेतृत्त्वपद दसुन शनाका याच्याकडे कायम आहे. तर चरिथ असलांका उपकर्णधार असेल. यापूर्वी श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेला अविष्का फर्नांडो भारत दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी बरेच महिने लागू शकतात. फर्नांडोच्या जागी दनुष्का गुणथिलाकाला १८ सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. तो भारताविरुद्ध टी२० संघात पुनरागमन करेल. फर्नांडोबरोबरच रमेश मेंडिस आणि नुवान थुसारा हेदेखील दुखापतीमुळे भारताविरुद्ध टी२० मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
https://twitter.com/OfficialSLC/status/1495683421686931456?s=20&t=l9YodjTD_J88_O82fioH0Q
तसेच दिनेश चंडिमल, वानिंदू हसरंगा यांनाही टी२० संघात जागा मिळाली आहे. हसरंगावर आयपीएलच्या मेगा लिलावात १०.७५ कोटींची बोली लागली होती. याखेरीज मिस्ट्री स्पिनर महिश तिक्षाणा आणि दुष्मंता चमीरा हेदेखील श्रीलंकेच्या टी२० संघाचा भाग आहेत.
श्रीलंकेचा १८ सदस्यीय टी२० संघ:
दसुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, दिनेश चंडीमल, दानुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, माहीश दीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रम, एशियाई डेनियल
भारताचा १८ सदस्यीय टी२० संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिका-
२४ फेब्रुवारी – पहिली टी२०, लखनऊ
२६ फेब्रुवारी – दुसरी टी२०, धरमशाला
२७ फेब्रुवारी – तिसरा टी२०, धरमशाला
महत्त्वाच्या बातम्या-
धवन स्टाइलमध्ये जल्लोष पाकिस्तानी खेळाडूला पडला महागात, दोन वेळा भरावा लागला दंड
वेंकटेश अय्यरचा ३६० डिग्री षटकार पाहून सोशल मीडियावर होतेय वाहवा, पाहा व्हिडिओ
साहाच्या आरोपांनंतर समोर आली द्रविडची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी जराही दुःखी नाही कारण…’






