---Advertisement---

आयपीएल इतिहासात प्रथमच असणार ऑरेंज कॅप-पर्पल कॅपसाठी स्पॉन्सर! ‘या’ कंपनीशी झाला करार

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 12:24 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी सर्व संघ व आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. पैशाचा पाऊस पडणाऱ्या या लीगमध्ये आता जगातील सर्वात मोठा ब्रँड देखील झळकणार आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामकोने आयपीएलला प्रायोजकत्व दिले आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच ऑरेंज कॅप व पर्पल कॅपसाठी ते प्रायोजक (Sponsor For Orange Cap & Purple Cap) असतील.

आयपीएल २०२२ सुरू होण्यासाठी आता १५ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयने या हंगामासाठी आपले सर्व प्रायोजक अंतिम केले. अखेरचे प्रायोजक म्हणून सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी तसेच ऍपलनंतर सर्वात मोठे बाजार मूल्य असलेली ‘सौदी अरामको’ यांना जोडले. ते सर्वाधिक धावा बनवणार्या खेळाडूला देण्यात येणाऱ्या ऑरेंज कॅप व सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला देण्यात येणाऱ्या पर्पल कॅपसाठी प्रायोजक असतील. विशेष म्हणजे यापूर्वी कधीही ऑरेंज कॅप व पर्पल कॅपसाठी प्रायोजक नव्हता. हा करार किती रुपयांमध्ये झाला आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. गतवर्षी ऑरेंज कॅप चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने तर पर्पल कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने जिंकली होती.

यापूर्वीच झाले कोट्यवधींचे करार

आयपीएलमध्ये यापूर्वी अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, स्टार इंडियाकडे प्रसारणाचे हक्क आहेत. इतरही अनेक ब्रँड दरवर्षी आयपीएलला प्रायोजकत्व देत असतात. यावर्षीच्या आयपीएलमध्ये प्रायोजकांकडून ८०० कोटी रुपये बीसीसीआयला मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

WIvENG| पहिल्या कसोटीत यजमान विंडीज फ्रंटफूटवर; बोनरचे अफलातून शतक भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! बेंगलोर कसोटीत १००% चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी 

टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांचे प्रमोशन! ‘त्या’ जबाबदारीसाठी सोडणार संघाची साथ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---