ऑस्ट्रेलिया दौर्यावर पोहोचलेला न्यूझीलंडचा संघ 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामना पर्थ येथे खेळला गेला. जेथे खेळाडूने नव्हे तर पंचाने एक मोठा विक्रम केला.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी पंच अलीम दारने वेस्ट इंडिजचे महान पंच स्टीव्ह बकनरचा विक्रम मोडला आणि सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावण्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.
पंच म्हणून अलीम दारचा हा 129 वा कसोटी सामना आहे. बकनर यांनी 128 कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे.
अलीम दार यांनी बर्याच वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होते. पण जेव्हा त्याला आपल्या कारकीर्दीत काही महत्त्वाचे साध्य करता आले नाही तेव्हा त्याने पंच बनण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये ढाकाच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या कसोटी सामन्यातून पंच म्हणून त्यांनी पदार्पण केले.
यानंतर ते थांबले नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पंचांमध्ये त्यांनी त्यांचे नाव कमावले.
जेव्हा मी या क्षेत्रात पंच म्हणून माझ्या कारकीर्दीची सुरुवात केली तेव्हा मी येथे पोहोचण्याचा विचारही केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम वेळ आहे, असे अलीम दार म्हणाले.
ते म्हणाले, ‘मी नेहमीच स्टीव्ह बकनरला माझा आदर्श म्हणून पाहिले आहे आणि आज मला वाटते की कसोटी सामन्यांमध्ये मी त्याच्यापेक्षा अधिक सामन्यात पंच म्हणून काम करणारा पंच होणार आहे. माझ्यासाठी हा विशेष आहे की माझ्या16 वर्षांच्या कारकीर्दीत मी क्रिकेटमध्ये घडलेल्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे.’
त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देताना अलीम दार म्हणाले की, यात ब्रायन लाराने केलेली नाबाद 400 धावांची खेळी आणि ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 435 धावांच्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेने केलेला यशस्वी पाठलाग अशा क्षणांचा समावेश आहे.






