---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा वेगवान गोलंदाज झाला जखमी…

On: सोमवार, डिसेंबर 16, 2019 9:22 PM
---Advertisement---

पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या दिवस- रात्र कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 296 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला हॅमस्ट्रिंगच्या दुखापत झाली. त्यामुळे तो 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.

पहिल्या कसोटीत खेळताना जोश हेझलवुडला स्नायूंमध्ये ताण आला होता आणि त्यामुळे तो चालू सामन्यातून बाहेर पडला आणि आता तो न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.

याबाबत माहिती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की शनिवारी एमआरआय स्कॅनने पुष्टी केली की जोश हेजलवुडला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघात जेम्स पॅटिन्सन आणि मायकल नेसर हे राखीव गोलंदाज आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1206576846810169345

https://twitter.com/Maha_Sports/status/1206574175587946496

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---