भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील २३वे शतक केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकुण ५८वे शतक होते.
त्याने काल १०३ धावांची खेळी करताना हा पराक्रम केला. या कसोटीतील पहिल्या डावात कोहलीने ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या या कसोटी सामन्यात बरोबर २०० धावा झाल्या.
याबरोबर कसोटीत दोन्ही डावात मिळुन सर्वाधिक वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला. त्याने हा पराक्रम जेमतेम ३८ कसोटी सामन्यात केला आहे.
अन्य खेळाडूंमध्ये ब्रायन लारा दुसऱ्या स्थानी असुन त्याने ४७ कसोटीत सामन्यात ७ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
कर्णधार असताना कसोटी सामन्यात २०० किंवा त्यापेक्षा अधिका धावा करणारे खेळाडू-
१०- विराट कोहली (सामने- ३८)
७- ब्रायन लारा (सामने- ४७)
७- रिकी पाॅंटींग (सामने- ७७)
६- डॉन ब्रॅडमन (सामने- २४)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ
–….आणि क्रिकेटमध्ये घडला ‘बाप’ योगायोग
–विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला
–या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला
–मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने