वनडे वर्ल्डकपचा महासंग्राम सुरू होण्यासाठी आता अवघे बारा दिवस शिल्लक आहेत. ज्यावेळी वनडे विश्वचषक जवळ येतो त्यावेळी भारतीय चाहत्यांना एक आठवण चांगलीच छळते. नाईंटीज किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलांना तर ही घटना आठवून आपल ब्रेकअप झाल्यासारखंच वाटतं. ती घटना होती 2003 वनडे वर्ल्डकपची फायनल.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेत आलेल्या भारतीय संघाने दमदार कामगिरी करत वीस वर्षानंतर फायनल मध्ये प्रवेश केलेला. सचिन वर्ल्डकपमध्ये तर पूर्ण सुटलेला होता. बाकीचे खेळाडू देखील कोणत्या ना कोणत्या सामन्यात हात वर करत मॅचविनिंग कामगिरी करत होते. स्वप्नवत कामगिरी करत सेमी फायनलपर्यंत आलेल्या केनियाला हरवून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली. फायनलमध्ये समोर होती रिकी पाँटिंगची गतविजेती ऑस्ट्रेलिया.
जोहान्सबर्ग येथील वॉंडरर्स स्टेडियमवर सामन्याला सुरुवात झाली आणि सौरव गांगुलीने टॉस जिंकला. सामन्यात भारताच्या बाजूने पडलेला हा पहिला आणि अखेरचा फासा. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जे काही केलं ते चकित करणार होत. पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ऍडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन यांनी पहिल्या षटकापासूनच भारतावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. गिलख्रिस्ट तर अक्षरशः तूटून पडला होता. पूर्ण वर्ल्डकप शांत गेलेल्या हेडनने दुसऱ्या बाजूने शांतच खेळ दाखवला. 14 व्या षटकातच 105 धावांची शतकी भागीदारी केल्यानंतर गिलख्रिस्ट बाद झाला आणि मैदानावर उतरला ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग.
हेडनही 20 व्या षटकात माघारी परतल्यावर सुरू झाला, पॉंटिंग-मार्टिन जोडीचा धुमाकूळ. यानंतर पूर्ण 50 शेटके संपल्यानंतरच ही जोडी ड्रेसिंग रूममध्ये परतली. आणि ऑस्ट्रेलियाच्या नावापुढे धावा होत्या 2 बाद 359
रिकी पॉंटिंगने 121 चेंडू खेळून.4 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार खेचून नाबाद 140 धावा काढल्या. मार्टिनने अंगठा दुखावलेला असताना देखील 88 धावांची वादळी खेळी केली. त्यावेळी ही वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तर, वर्ल्डकपच्या सामन्यात एकाच डावात आठ सिक्स मारणारा पॉटिंंग पहिला फलंदाज ठरलेला. धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया पहिल्या षटकापासूनच गडबडली आणि पदरी पडला 125 धावांनी मोठा आणि लाजिरवाणा पराभव. पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याच स्वप्न आणखी चार वर्षे पुढे ढकलला गेल होत.
हे सगळं झालं तरी पॉंटिंग याची ती इनिंग आणि त्यानंतर भारताच्या गल्ली-गल्लीत झालेली त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती म्हणून तो असा खेळला ही चर्चा. पुन्हा फायनल होणार या अफवेवर सहा महिने लोकांनी काढली. मात्र, अखेर पॉंटिंगच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय दुसरे काही घडले नाही.
पुढे भारताने आठ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. मात्र, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील 23 मार्च 2003 हा दिवस वाईट आठवणींसाठीच लक्षात राहिला आणि त्याचा खलनायक ठरला रिकी पॉंटिंग.
(2003 ODI World Cup Ricky Ponting Pummels India In 2003 World Cup Final)
महत्वाच्या बातम्या –
सेट झालेल्या स्मिथचा त्रिफळा, शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज गुडघ्यांवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा