२००७ चा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच २००८ साली बीसीसीआयने आयपीएल नावाच्या संकल्पनेला जन्म दिला .२०१७मध्ये आयपीलला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या मागील १० वर्षात बरेच रेकॉर्ड बनले आणि बरेच रेकॉर्ड मोडले. पण असे ५ रेकॉर्ड आहेत जे की २००८ च्या आयपीलच्या पहिल्या मोसमात बनले आणि ते अजूनही मोडले नाहीत . पाहुयात कोणते आहेत हे ५ रेकॉर्ड.
१. सर्वात जास्त धावांनी (१४०)
पहिल्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात कोलकात्याकडून खेळताना न्यूझीलंडच्या ब्रेंडन मककल्लमने तुफानी खेळी करून ७३ चेंडूत १५८ धाव करत बेंगलोरपुढे २२३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तर देताना बंगलोरच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि बेंगलोरचा डाव ८२ धावांत संपला आणि कोलकाता १४० धावांनी विजयी झाला. हा आता पर्यंतचा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय होता .
२ सर्वाधिक अतिरिक्त धावा (२८)
आयपीलच्या चौथ्याच सामन्यात हा विक्रम तेव्हाच्या हैद्राबादच्या (डेक्कन चार्जेर्स) संघाने केला . कोलकत्या विरुद्ध खेळत असताना हैद्राबादच्या गोलंदाजांनी १५ अवांतर धावा, १ नो बॉल , ८ लेगबाईस आणि ४ बाईस दिले होते. २०११ मध्ये बेंगलोर संघने २७ अतिरिक्त धाव देऊन या विक्रमाच्या जवळ आले.
३. सर्वोत्तम गोलंदाजी (सोहेल तन्वीर ६/१४)
४ मे २००८ साली चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राजस्थानकडून खेळणाऱ्या सोहेल तन्वीरने १४ धाव देऊन ६ गाडी बद केले होते. तन्वीर आतापर्यंत आयपीलमध्ये ६ गडी बाद करणारा पहिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी झाम्पानेही ६ विकेट घेतल्या परंतु तन्वीरपेक्षा जास्त धावा दिल्या. त्यानंतर दुसर्या मोसमात २६/११ च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीलमध्ये बंदी घालण्यात आली.
४. दोनी संघांच्या मिळून सर्वात कमी धाव ( १३५ मुंबई विरुद्ध कोलकाता )
कोलकाताने मुंबई विरुद्ध २००८ मध्ये प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात फक्त ६७ धाव केल्या , मुंबईच्या फलंदाजांनी ५ षटकात त्या धावा करताना सामना समाप्त केला . मुंबईच्या सनथ जयसूर्याने १७ चेंडूत ४८ धावा करत हा सामना खिशात घातला .
५. एका डावात सर्वाधिक झेल (सचिन तेंडुलकर -४)
विक्रमांबद्दल लिहीत असताना विक्रमांचा देवता असलेला सचिन रमेश तेंडुलकरच नाव नाही येणार अस कस शक्य आहे . सचिनने मुंबईकडून खेळताना कोलकत्या विरुद्ध सलमान बट, वृद्धिमान साहा, अजित आगरकर आणि शोएब अख्तर या फलंदाजांचे झेल घेतले. एका डावात सर्वाधिक झेल घ्यायचा विक्रम आजही सचिनच्या नावावर आहे.