गोल्ड कोस्ट । कुस्तीपटू राहूल आवारे, सुशील कूमार पाठोपाठ भारताला राष्ट्रकूल स्पर्धेत कुस्तीतून तिसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे बजरंग पुनियाने. त्याने ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
भारताचे हे कुस्तीतील तिसरे सुवर्ण तर स्पर्धेतील एकूण ३८वे पदक ठरले.
एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात बजरंग पुनियाने वेल्सच्या केन चॅरिगचा १०-० असा पराभव केला. केन चॅरिगला त्याच्या विरुद्ध एकही गुण घेता आला नाही. हा लढत केवळ दोन मिनीटे चालली.
भारताकडे आता यावर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत एकूण ३८ पदके मिळाली असून त्यात १७ सुवर्ण, ९ रौप्य तर १२ कांस्यपदकांचा समावेश आहे. ३८मधील ७ पदके कुस्तीतून आली आहेत.