जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताला आज पहिले सुवर्णपदक मिळाले. पुरूषांच्या ६५ किलो गटात कुस्तीपटू बजरंग पुनियाने जपानच्या टाकाटानी दाइचीला ११-८ असे पराभूत करत हे सुवर्णपदक पटकवले.
२४ वर्षीय या भारतीय खेळाडूने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तीन सुवर्ण पदक पटकावले आहे. पहिल्या फेरीत पुनिया ६-४ असा आघाडीवर होता. शेवटचा एक मिनिट बाकी असताना तो १०-०असा पुढे होता.
सुवर्ण पदक जिंकण्याआधी त्याने उजबेकीस्तानच्या खासानोव सिरोजिद्दीन, ताजीकीस्तानच्या फयझी अब्दुलकोजिम आणि मंगोलियाच्या बटचूलून बॅटमंगइला पराभूत केले आहे.
भारताने आज नेमबाजीत कास्यंपदक जिंकत खाते उघडले. १० मीटर मिश्र एयर रायफलमध्ये रवी कुमार आणि अपूर्वी चंदेला यांनी भारतासाठी हे पहिले पदक मिळवले.
तसेच महिलांच्या हॉकीमध्ये भारताने यजमान इंडोनेशियाचा ८-० असा पराभव केला आहे. अशाप्रकारे भारताने पहिल्या दिवशी दोन पदक मिळावली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती