मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एमएस धोनीचे सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये नाव घेतले जाते. पण आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनला धोनीपेक्षाही सध्याच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलर चांगला वाटतो.
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला व्हाईटवॉशचा धक्का दिला. इंग्लंडच्या विजयात बटलरने मोलाची भूमिका पार पाडली. त्याच्या या कामगिरीचे टीम पेनने कौतुक केले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज असणारा पेन बटलरबद्दल म्हणाला, तो खूप चांगला आहे. सध्याच्या घडीला तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे.
पेन पुढे म्हणाला, ‘मला वाटत नाही की त्याच्यासमोर खूप खेळाडूंचे आव्हान आहे. धोनी चांगला आहे, पण सध्याच्या घडीला बटलर त्याच्या कारकिर्दितील शिखरावर आहे. त्याला त्याचा वनडेचा खेळ माहित आहे. तसेच त्याला त्याची ताकद माहित आहे.’
बटलरने 24 जूनला पार पडलेल्या 5 व्या वनडेत शतकी खेळी केली होती. त्याच बरोबर त्याने या मालिकेत दोन अर्धशतकही केले आहेत. त्याने या मालिकेत एकूण 275 धावा केल्या आहेत.
बटलर यावर्षीच्या आयपीएल मोसमापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएलमध्ये यावर्षी 13 सामन्यात 548 धावा केल्या आहेत.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इंग्लंडच्या कसोटी संघातही पुन्हा स्थान देण्यात आले होते. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बटलरने दोन अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–रोनाल्डो-मेस्सी वादात आता कोहलीची ‘विराट’ उडी; ह्या खेळाडूला म्हटले महान!
–ब्रिटनमध्ये पोहचताच टीम इंडिया पहिले हे काम केले!
–होय, मास्टर ब्लास्टर सचिन चुकला…