---Advertisement---

MI vs KKR: हा ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

On: मंगळवार, एप्रिल 1, 2025 8:18 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील काल (31 मार्च) मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआर संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 116 धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, मुंबईने हे लक्ष्य 13व्या षटकातच पूर्ण केले, यासह संघाने हंगामातील त्यांचा पहिला विजय नोंदवला. सलग दोन पराभवांना तोंड दिल्यानंतर, मुंबईला चालू हंगामातील पहिला विजय मिळाला.

टाॅस गमावल्यानंतर पहिल्या डावात खेळताना केकेआरची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाला पहिल्या षटकात सुनिल नारायणच्या (0) रुपाने पहिला धक्का बसला. यानंतर दुसऱ्या षटकात डावखुरा क्विंटन डी काॅकही (1) बाद झाला. संघाने पाॅवरप्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 11 धावांवर अश्विनी कुमारचा बळी ठरला. आशाप्रकारे केकेआरने 6 षटकांच्या आत 4 विकेट्स गमावल्या, यानंतरही मुंबई इंडियन्सन सातत्याने विकेट्स घेत राहीला ज्यामुळे केकेआर सामन्यात कमबॅक करु शकला नाही. परिणामी संघाला मर्यादित 20 षटकांत 116 धावा करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबईला निश्चितच जलद सुरुवात दिली, परंतु रोहित शर्माचा खराब फॉर्म अजूनही सुरू आहे. रोहित फक्त १३ धावा करून बाद झाला. रायन रिकेल्टनने नाबाद 62 धावा केल्या, शेवटी सूर्याने 9 चेंडूत 30 धावा करत संघाला हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---