न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. (T20 series between IND vs NZ) या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य होते. मात्र, 112 धावांपर्यंत भारताचे 6 फलंदाज बाद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत तिलक वर्मा (Tilak verma & Nitish Kumar Reddy) आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर त्यांनी 17 वर्षांपूर्वीचा एक मोठा विक्रम मोडला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला यशस्वी धावांचा पाठलाग करताना सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम यापूर्वी इरफान पठाण (Irfan Pathan & Yusuf Pathan) आणि युसूफ पठाण यांच्या नावावर होता. 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना या दोघांनी सातव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली होती.
आता तिलक वर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सातव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करत हा विक्रम मोडला. विशेष म्हणजे, पूर्ण सदस्यत्व असलेल्या संघांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करताना सातव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारींमध्ये ही संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक भागीदारी ठरली आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करताना सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारी (पूर्ण सदस्य संघ)
आफिफ हुसेन आणि मोसद्देक हुसेन (बांगलादेश) – 82 धावा, झिम्बाब्वेविरुद्ध (2019)
चमिका करुणारत्ने आणि दसुन शनाका (श्रीलंका) – 69 धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2022)
तिलक वर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी (भारत) – 69 धावा, न्यूझीलंडविरुद्ध (2026)
वेन पार्नेल आणि रस्टि थेरॉन (दक्षिण आफ्रिका) – 64 धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2011)
युसूफ पठाण आणि इरफान पठाण (भारत) – 59 धावा, श्रीलंकेविरुद्ध (2009)
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्माने नाबाद 51 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने आणखी एका विक्रमात हार्दिक पांड्याला मागे (Hardik pandya) टाकले आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये तिलक आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिलक आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिला असून, या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
दुसरीकडे, हार्दिक पांड्या 11 सामन्यांमध्ये नाबाद राहिला आहे. यापैकी 10 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. या यादीत पहिल्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आहे. धोनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 20 सामन्यांमध्ये नाबाद राहिला होता. यापैकी 15 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता.






