टीम इंडिया आणि न्युझीलंड (Team india vs new zealand) दोन्ही संघात आज टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात तिलक वर्माने (Tilak verma) जोरदार कामगिरी करत (T20 Series between india vs new zealand) टीम इंडियाचा पराभव वाचवत जोरदार विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना तिलकने अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.
भारताला शेवटच्या 3 षटकांत म्हणजेच 18 चेंडूंत विजयासाठी 46 धावांची गरज असताना तिलकने ही आक्रमक खेळी केली. टी-20 क्रिकेटमध्ये तिलक 26 वेळा नाबाद राहिला असून, या प्रत्येक वेळी त्याच्या संघाने विजय मिळवला आहे.
या आकडेवारीत आयपीएल आणि इतर टी-20 सामन्यांचाही समावेश आहे. म्हणजेच, तिलकने 26 वेळा नाबाद राहत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यातही तिलकने अशीच कामगिरी केली होती. त्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्याने नाबाद 69 धावा केल्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना तिलक वर्माच्या नाबाद खेळी
61* (२९ चेंडू) विरुद्ध चंदीगड – विजय
34* (32 चेंडू) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – विजय
29* (21 चेंडू) विरुद्ध राजस्थान रॉयल्स – विजय
26* (10 चेंडू) विरुद्ध पंजाब किंग्स – विजय
49* (37 चेंडू) विरुद्ध वेस्ट इंडिज – विजय
7* (5 चेंडू) विरुद्ध वेस्ट इंडिज – विजय
55* (26 चेंडू) विरुद्ध बांगलादेश – विजय
41* (31 चेंडू) विरुद्ध मेघालय – विजय
58* (43 चेंडू) विरुद्ध जम्मू-काश्मीर – विजय
40* (24 चेंडू) विरुद्ध मिझोराम – विजय
16* (10 चेंडू) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विजय
37* (32 चेंडू) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – विजय
36* (30 चेंडू) विरुद्ध ओमान – विजय
51* (31 चेंडू) विरुद्ध बिहार – विजय
19* (16 चेंडू) विरुद्ध इंग्लंड – विजय
72* (55 चेंडू) विरुद्ध इंग्लंड – विजय
21* (17 चेंडू) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – विजय
2* (2 चेंडू) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – विजय
30* (19 चेंडू) विरुद्ध पाकिस्तान – विजय
69* (53 चेंडू) विरुद्ध पाकिस्तान – विजय
26* (34 चेंडू) विरुद्ध दक्षिण आफ्रिका – विजय
75* (33 चेंडू) विरुद्ध पंजाब किंग्स – विजय
6* (5 चेंडू) विरुद्ध झिम्बाब्वे – विजय
3* (4 चेंडू) विरुद्ध अफगाणिस्तान – विजय
15* (14 चेंडू) विरुद्ध अफगाणिस्तान – विजय
51* (26 चेंडू) विरुद्ध न्यूझीलंड – विजय
तिलकने आतापर्यंत आपल्या टी-20 कारकिर्दीत 180 सामने खेळले आहेत. 2019 मध्ये हैदराबादकडून खेळताना सर्व्हिसेसविरुद्ध त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या प्रकारात 171 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 41.32 च्या सरासरीने आणि 145.72 च्या स्ट्राइक रेटने 5,166 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 151 आहे.
याशिवाय, 29 डावांमध्ये गोलंदाजी करताना तिलकने 12 विकेट्स घेतल्या असून, गोलंदाजीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी 26 धावांत 2 विकेट्स अशी आहे.




