महाराष्ट्रमध्ये कबड्डी खेळ म्हटलं तर गावोगावी पोहचला आहेच. पण सध्या कबड्डीची लोकप्रियता पाहता इतर देशाही या खेळाकडे वळू लागले आहेत. कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कमी देशामध्ये खेळला जात आहे. प्रो कबड्डीमुळे कबड्डीला एक ग्लॅमर आला आहे, कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली आहे. आयपीलप्रमाणेच प्रो कबड्डीमध्ये सध्या परदेशी खेळाडूंना संधी मिळत असल्याने परदेशी खेळाडू कबड्डी मोठ्या प्रमाणावर खेळू लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत, बांगलादेश, इराण व पाकिस्तान असे काही मोजक्याच देशाव्यतिरिक्त इतर संघ तेवठे तुल्यबळ नाहीत. आपल्याकडे जिल्हास्तरीय स्पर्धे ते राष्ट्रीय पातळीवर कबड्डीत जेवढी चुरस बघायला मिळते तेवढी स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर बघायला मिळत नाही कारण इतर देशातील खेळाडूंमध्ये कबड्डीच कौशल्य भारतीय खेळाडूंच्या तुलनेने कमी आहे.
कबड्डी खेळांची वाढती लोकप्रियता पाहता इतर देशही कबड्डी खेळू लागले आहेत. ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत, त्यामध्ये कबड्डी खेळाचा समावेश असतो. यास्पर्धेत जपानचा संघ पण खेळणार आहे. स्पर्धाच्या तयारीच्या दृष्टीने जपान कबड्डी संघाने मागील आठवड्यात भारत दौरा केला. कबड्डी खेळाची कौशल्ये अवगत करणे, सराव करण्यासाठी हा दौरा होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जपान संघाने सहा दिवस प्रेक्षणीय सामने खेळले.
१९ मे रोजी जपान राष्ट्रीय कबड्डी संघ भारतात आला होता. त्यानंतर पुढील सहा दिवस जपान संघाने रायगड जिल्ह्यात कबड्डीचा सराव केला. सहा दिवस रायगड जिल्ह्यातील स्थानिक व व्यवसायिक संघ विरुद्ध जपान संघाने प्रेक्षणीय सामने खेळले. अर्जुन पुरस्कार विजेते श्री अशोक शिंदे यांनी जपान संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं.
जपान संघाची जबाबदारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कडे होती. तर कबड्डी सामन्याचा आयोजन रिलायन्स कंपनी, नागोठणे रायगड यांनी केली होती, तिथे संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. २० मे ते २५ मे दरम्यान जपान संघाने प्रेक्षणीय सामने खेळले. यादरम्यान अनेक मान्यवरांनी या सामन्यांना भेट दिली. २६ मे रोजी जपान राष्ट्रीय कबड्डी संघ जपानला रवाना झाला.
प्रेक्षणीय सामन्याचे निकाल:
रिलायन्स कंपनी विरुद्ध जपान
रिलायन्स विजयी
रिलायन्स कंपनी विरुद्ध जपान
जपान विजयी
बालयुवक पेझारी विरुद्ध जपान
सामना बरोबरीत
साहिल स्पोर्ट्स वेअर विरुद्ध जपान
जपान विजयी
प्रो कबड्डी यंगस्टार विरुद्ध जपान
यंगस्टार विजयी
जेएसडब्ल्यू विरुद्ध जपान
जेएसडब्ल्यू विजयी
नागोठणे असोसिएशन विरुद्ध जपान
जपान विजयी
महत्त्वाच्या बातम्या-
–बिंगा बाॅयज आणि इरफान वाॅरियर्समध्ये रंगला प्रो-कबड्डीचा सामना !
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम