विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रीस गेलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०१९ विश्वचषकानंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे. ख्रिस गेलने अ दर्जाच्या क्रिकेटमधून काही महिन्यांपुर्वीच निवृत्ती घेतली आहे. तसेच तो कसोटी क्रिकेट सध्या खेळतच नव्हता.
ख्रिस गेल हा त्या ५ खेळाडूंपैकी आहे ज्यांनी २००० मध्ये किंवा त्यापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
गेलने ११ सप्टेंबर १९९९ रोजी भारताविरुद्ध टोरोंटो येथे वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला केवळ १ धाव करता आली होती.
गेलपुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला परंतु निवृत्ती घोषीत न केलेला एकमेव खेळाडू म्हणजे हरभजन सिंग. भज्जीने २५ मार्च १९९८ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
हरभजन सिंगला मार्च २०१६ नंतर राष्ट्रीय संघात कोणत्याच प्रकारात स्थान देण्यात आले नाही. सध्या भज्जी समालोचन कक्षात समालोचन करताना दिसतोय. तसेच तो देशांतर्गत क्रिकेट खेळतानाही गेले काही महिने दिसला नाही.
युवराज सिंगने जून २०१७मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळला आहे. त्याने ३ ऑक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
पाठीमागे युवराजने आपण २०१९ विश्वचषकापर्यंत संघात स्थान मिळविण्यासाठी आशावादी असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे हा खेळाडू विश्वचषकानंतर काय निर्णय घेतो याकडे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.
विश्वचषक २०१९साठी संघातील १५ खेळाडूंची नावे पाठविण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. यामुळे याच काळात युवराजकडून अशी काही घोषणा होऊ शकते.
शोएब मलिक सध्या पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे. त्याने १४ ऑक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरारष्ट्रीय पदार्पण केले होते. तो सध्या पाकिस्तान टी२० संघाचा नियमित सदस्य़ आहे.
शोएब मलिक शेवटचा वनडे सामना जानेवारी महिन्यातच खेळला आहे तर टी२० सामना याच महिन्यात खेळला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून मलिककडे पाहिले जाते. आपण २०२०मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर निवृत्त होणार आहे असे त्याने यापुर्वीच सांगितले आहे. यामुळे २०१९ मधील ५० षटकांच्या विश्वचषकानंतर तो वनडेतून निवृत्ती घोषीत करु शकतो.
४ ऑक्टोबर २००० रोजी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मार्लन सॅम्युएल सध्या विंडीजच्या वनडे संघात आहे. तो शेवटचा सामना १४ डिसेंबर २०१८ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी
–केएल राहुलची निवड करताना अजिंक्य रहाणेवर अन्याय? वाचा
–टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
–पंतचा समावेश योग्य का? धोनी, कार्तिक व पंतची गेल्या एक वर्षातील कामगिरी पहाच