---Advertisement---

भारतीय संघाचं भविष्य अशी ओळख असलेल्या पृथ्वी शॉबद्दलची ‘ही’ हटके माहिती

On: शुक्रवार, जुलै 24, 2020 11:22 AM
---Advertisement---

८ ऑक्टोबर २०१८ रोजी पृथ्वी शॉने वयाच्या १८व्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. राजकोट कसोटीत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना त्याने १३४ धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा तो २९३ खेळाडू ठरला होता.

त्यानंतर आजपर्यंत शॉने ४ कसोटी व ३ वनडे सामने खेळले आहेत. फेब्रुवारी २०२०नंतर तो कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. परंतु शॉकडे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठा तारा समजले जाते. अशा या ताऱ्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी…

पृथ्वी शाॅच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात- 

१. पृथ्वी शाॅने २०१३ मध्ये १४ वर्षांचे असताना रिझवी स्कूलकडून १६ वर्षाखालील स्पर्धेत ३०० चेंडूत ५४६ धावांची खेळी होती. यावेळी पहिल्यांदा त्याचे नाव चर्चेत आले.

२. शाॅने दोन वेळा (२०१२ आणि २०१३) कर्णधार म्हणुन रिझवी स्कूलला हॅरिस शिल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवुन दिले आहे.

३.दुलिप आणि रणजी पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतक केले होते. याबरोबर या स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा  तो सचिननंतर केवळ दुसरा खेळाडू ठरला होता.

४. दुलिप ट्राॅफीमध्ये वयाच्या १७व्या शतक नोंदवत या स्पर्धेत सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान पृथ्वी शाॅला मिळाला आहे. त्याने याबरोबर सचिनचा या स्पर्धेतील तरुण शतकवीराचा विक्रमही मोडला होता. २०१७-१८च्या दुलिप ट्राॅफी फायनलमध्ये त्याने हा पराक्रम केला होता.

५.शाॅने आपल्या पहिल्या ९ प्रथम श्रेणी सामन्यात ५ शतके केली आहेत.

६. २०१२मध्ये शाॅला इंग्लंडमधील शेडल हॅम्ले स्कूलकडून खेळण्यासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच येथे शतक केले होते तर दोन महिन्यात तब्बल १४४६ धावा केल्या होत्या.

७. फेब्रुवारीमध्ये शाॅच्याच नेतृत्वाखाली १९ वर्षाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.

८. क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा शाॅ विरार ते चर्चगेट हा तब्बल २ तासांचा प्रवास करत सरावासाठी मुंबईत येत असे. त्यानंतर त्याला शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याच्या मदतीने सांताक्रुझ येथे फ्लॅट मिळाला आणि त्याचा हा २ तासांचा वेळ वाचत सरावाला वेळ मिळाला.

९. जानेवारी २०१८मध्ये आयपीएल लिलावात पृथ्वी शाॅला तब्बल १.२ कोटी रुपये मोजत दिल्ली डेअरडेविल्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याची या हंगामासाठी बेस प्राईज केवळ २० लाख होती.

१०. पृथ्वी शाॅने आजपर्यंत २२ प्रथम श्रेणी सामन्यात ५७.८१ च्या सरासरीने एकूण २१९७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ९ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

११. त्याने ३३ लिस्ट ए सामन्यात ४१.९३ च्या सरासरीने १३८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

१२. आयपीएलमध्ये शाॅने एकूण २५ सामने खेळताना २३.९२ च्या सरासरीने ५९८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment