टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणे इतके सोपे काम नाही. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावता आलेले नाही. टी-२० मध्ये शतक झळकावण्यासाठी फलंदाजास अतिशय वेगवान खेळावे लागते. त्यासाठी त्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागते.
आतापर्यंत अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये शतके ठोकली आहेत. युवराज सिंग, सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या असे खेळाडू टी-२० क्रिकेटचे हिरे मानले जातात. मात्र, शतक ठोकण्याविषयी बोलायचे झाले तर विराट कोहलीने अद्याप हे यश मिळवले नाही.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारतीय संघातील फक्त २ फलंदाजांनी ५० चेंडूंच्या आत शतक ठोकले आहे. हे दोन्ही फलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणारे भारतीय खेळाडूही आहेत. तर मग आपण जाणून घेऊया की टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे ते २ भारतीय फलंदाज कोण आहेत?
या दोन भारतीय फलंदाजांना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकण्यात आले यश
२. केएल राहुल (KL Rahul) – ४६ चेंडू
केएल राहुल हा एक टी-२० मधील स्फोटक फलंदाज आहे. २०१६ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त ४६ चेंडूत शतक ठोकले होते. या सामन्यात राहुलने ५१ चेंडूत नाबाद ११० धावा फटकावल्या. त्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ५ षटकार ठोकले होते. परंतु भारतीय संघाने हा सामना केवळ १ धावांनी गमावला.
पहिल्या डावात वेस्ट इंडीज संघाने ६ गडी गमावून २४५ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ २४४ धावा करू शकला. भारतीय संघासाठी रोहित शर्मानेही या सामन्यात २८ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या.
१. रोहित शर्मा (Rohit Sharma)
‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताला बरेच सामने जिंकून दिली आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४ शतके ठोकली असून भारताकडूनच नाही तर जगातील वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतकी खेळी करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
रोहित शर्माने २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध तुफानी फलंदाजी करत केवळ ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ४३ चेंडूत ११८ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि १० षटकार ठोकले आणि त्याचा स्ट्राइक रेट २७४.४१ होता.
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजीत अव्वल असणाऱ्या सचिन तेंडुलकरचे गोलंदाजीतील हे २ पराक्रम ऐकून आश्चर्य वाटेल!
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे