आयपीएल म्हणजे जगातील मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेमध्ये खेळायचे स्वप्न देश-परदेशातील प्रत्येक खेळाडू पाहत असतो. सर्वच खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होते असे नाही. काही खेळाडूंना संधी मिळते पण रक्कम कमी मिळते तर बऱ्याचदा काही खेळाडूंना अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळते. तसेच संधी मिळाल्यावर युवा खेळाडूही आपला खेळ दाखवतात. म्हणूनच आयपीएलला सध्या टी-२० ची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.
२००८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला मोठे यश मिळाले आणि त्यानंतर दरवर्षी हा आलेख वाढत गेला. बर्याच खेळाडूंनी आपल्या खेळाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. यावर्षी आयपीएलचा १३ वा खेळाला जाईल. कोरोना विषाणूमुळे यंदा आयपीएलचा हा हंगाम भारताबाहेर १९ सप्टेंबर रोजी युएईमध्ये होत आहे. यावेळीदेखील दरवर्षीप्रमाणे काही नवीन आणि काही जुने चेहरे या स्पर्धेत पाहायला मिळतील. बरेच खेळाडू या हंगामात आयपीएल मधील आपला पहिला सामना खेळातील तर काहींना प्रतीक्षा करावी लागेल.
या लेखात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ३ दिग्गज खेळाडूंचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना आयपीएलमध्ये एकदाच खेळण्याची संधी मिळाली. हे खेळाडू एका सामन्यानंतर पुन्हा कधी खेळले नाहीत.
आयपीएल कारकिर्दीत एकच सामना खेळणारे ३ दिग्गज खेळाडू
अब्दूर रझाक (Abdur Razzak)
बांगलादेश संघाचा फिरकी गोलंदाज अब्दूर रझाक बांगलादेशकडून तीनही स्वरूपातील क्रिकेट खेळला आहे. पण आयपीएलमध्ये त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. २००८ मध्ये रझाकने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमधील एकमेव सामना खेळला होता. गोलंदाजीत त्याला काही यश आले नाही आणि फलंदाजीमध्ये तो शून्य धावांवर नाबाद राहिला. अब्दूर रझाक यानंतर आयपीएलच्या इतर कोणत्याही सामन्यात खेळताना दिसला नाही. बांगलादेशकडून तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ सामने खेळला आणि ४४ बळी मिळवले आहेत.
ब्रेड हॅडिन (Brad Haddin)
२०११ च्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळायला मिळाले. या एकमेव सामन्यात, हॅडिनने ११ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर तो आयपीएलमध्ये कोणताही सामना खेळला नाही. आयपीएलच्या पुढील काही मोसमात तो संघाचा सदस्य होता, परंतु अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळाले नाही.
डॅमियन मार्टिन (Damien Martin)
ऑस्ट्रेलियन फलंदाज डॅमियन मार्टिनची आयपीएल कारकीर्द एकाच सामन्यात संपुष्टात आली. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून त्याने आयपीएलचा एकमेव सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने २४ चेंडूंचा सामना करत १९ धावा केल्या. यानंतर त्याला आयपीएलमधील कोणत्याही संघात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि अशाप्रकारे त्याची आयपीएल कारकीर्द संपुष्टात आली.