---Advertisement---

या ४ भारतीय क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्ये शतक कायमच रुसले

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 8:26 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये ३४ खेळाडूंनी शतकी खेळी केल्या आहेत तर १० खेळाडूंनी ४ हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आयपीएल कारकिर्दीत ४४५ धावा करणाऱ्या खेळाडूपासून ते ५४१२ धावा करणाऱ्या खेळाडूंनी शतकी खेळी केल्या आहेत.

परंतु ४ असेही खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये ४ हजार धावा केल्या आहेत परंतु त्यांना शतक करता आलेले नाही.

शिखर धवन, एमएस धोनी, राॅबीन उथप्पा आणि गौतम गंभीर यांना आयपीएलमध्ये शतकी खेळी करता आलेली नाही.

शिखर धवनने ३७, एमएस धोनीने २३, राॅबीन उथप्पाने २४ तर  गौतम गंभीरने ३६ आयपीएल अर्धशतके केली आहेत. परंतु त्यांना शतकी खेळी करण्यात अपयश आले आहे. गौतम गंभीर(९३), राॅबीन उथप्पा (८७), एमएस धोनी (नाबाद ८४) तसेच शिखर धवन (नाबाद ९७) या त्यांच्या सर्वोच्च धावा राहिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment