---Advertisement---

देशाकडून एकही सामना न खेळण्याची संधी मिळालेले ५ महान क्रिकेटर

On: शुक्रवार, ऑगस्ट 21, 2020 2:49 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा खेळाडू देशांतर्गत पातळीवर खेळतो, तेव्हा तो आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न बाळगून असतो. खरं तर एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घावी लागते.

तसे पाहता भारतीय क्रिकेटमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत, ज्या खेळाडूंमध्ये भरपूर कौशल्य आहे पण तरीही भारतीय संघाकडून तो खेळू शकला नाही. या लेखात अशा ५ महान खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकली नाही.

या ५ प्रतिभावान खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही

१. राजिंदर गोयल (Rajinder Goyal)

क्रिकेटमध्ये तुमची प्रतिभा आणि चमकदार कामगिरी असूनही तुमचे नशीब ठीक नसेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही. प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये गोलंदाजीत ७५० बळी घेऊन जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही, भारतीय संघात स्थान मिळविता न येणाऱ्या हरियाणामधील राजिंदर गोयल यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात राजिंदर हे सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाज ठरले आहेत. गोयल एक लेगस्पिन गोलंदाज होते आणि त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५७ सामन्यात १८.५८ च्या अत्यंत प्रभावी सरासरीने ७५० बळी मिळविले.
त्यांनी ५९ वेळा ५ बळी तर १८ वेळा १० बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. त्यांचीसर्वोत्तम कामगिरी ही ५५ धावा देत ८ गडी बाद अशी आहे. ते ६०-७० च्या दशकात जबरदस्त कामगिरी करत होते. पण अशा नेत्रदीपक कामगिरीनंतरही त्यांना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकली नाही.

२. श्रीधरन शरत (Sreedharan Sharat)

श्रीधरन शरत हे तमिळनाडू क्रिकेट संघाचे एक महान फलंदाज होते. श्रीधरन शरत यांचे देशांतर्गत क्रिकेट मध्ये मोठे नाव होते, परंतु तरीही त्यांना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकली नाही.

४७ वर्षीय श्रीधरन शरत एक डावखुरे फलंदाज होते आणि त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३९ सामने खेळले. त्यांनी फलंदाजीमध्ये ५१.१७ च्या उत्कृष्ट सरासरीने ८७०० धावा फटकावल्या आहेत. यात त्यांनी २७ शतके आणि ४२ अर्धशतकेही केली.१

९९३ मध्ये त्यांना एका मोटरसायकल अपघातामुळे गंभीर दुखापत झाली, त्यातून ते लवकर बरे होऊ शकले नाही. यामुळे भारतीय संघाकडून पदार्पण करण्याचे त्यांचे स्वप्न या अपघाताने संपले. जरी ते भारताकडून खेळू शकले नसले तरी रणजी चषकाच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी ते एक होते.

३. पद्माकर शिवलकर (Padmakar Shivalkar)

पद्माकर शिवलकर हा त्याच्या काळातील एक जबरदस्त गोलंदाज होता. खासकरुन रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या ट्रॅक रेकॉर्डचे खूप कौतुक झाले. त्याच्या कारकीर्दीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबई क्रिकेट संघासाठी २५ हून अधिक रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळल्या.

या माजी लेगस्पिन गोलंदाजाने १२४ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात १९.६९ च्या उत्तम सरासरीने ५८९ बळी मिळवण्यात यश मिळविले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ८/१६ होती. एवढी उत्तम कामगिरी असूनही त्याला भारतीय संघातून पदार्पण करण्याची संधी मिळू शकली नाही.

मुंबई क्रिकेटला शिखरावर पोहोचविण्यात त्याने मोठी भूमिका बजावली, परंतु तरीही त्याचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न फक्त एक स्वप्न राहिले. पद्माकर शिवलकर साधारण ५० वर्षांचे असताना निवृत्त झाला.

४. मिथुन मन्हास (Mithun Manhas)

मिथुन मन्हास हा दिल्लीतील जबरदस्त फलंदाज होता. तो दिल्ली संघाकडून मधल्या फळीत फलंदाजी करायचा. मिथुनदेखील अशा दुर्दैवी खेळाडूंपैकी एक होता, ज्यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नव्हती, परंतु असे असूनही भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकली नाही.

मिथुन मन्हास दिल्ली क्रिकेटमध्ये एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. २००८ मध्ये दिल्लीला रणजी चषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. दिल्लीच्या या माजी कर्णधाराने रणजीमध्ये ८ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्या बरोबरीनेच मिथुन मन्हासने खेळण्यास सुरुवात केली होती. हे दिग्गज खेळाडू भारतीय संघात यापूर्वीपासूनच असल्यामुळे मिथुनला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.

मिथुन मन्हासने १५७ प्रथम श्रेणी सामन्यात ४५.८२ च्या प्रभावी सरासरीने ९७१४ धावा केल्या आहेत. त्याने २४४ डावात २७ शतके आणि ४९ अर्धशतके ठोकली. तर १३० अ श्रेणीतील सामन्यांमध्ये फलंदाजीत त्याने ४६ च्या सरासरीने ४१२६ धावा केल्या आहेत.

५. अमोल मुजूमदार (Amol Muzumdar)

अमोल हा भारतातील देशांर्गत क्रिकेटचा दिग्गज सर्वोत्कृष्ट फलंदाज होता. ९० च्या दशकात तो फलंदाजी करायचा आणि मोठं-मोठ्या गोलंदाजांवर तो अधिराज्य गाजवायचा.

तो मुंबई व्यतिरिक्त आंध्र प्रदेश आणि आसामकडूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. रणजी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारा अमोल हा पहिला फलंदाज होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० च्या वर होती. पण राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सारख्या दिग्गज संघात असल्याने त्याला कधीही पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
या माजी फलंदाजाने १७१ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८.१३ च्या सरासरीने १११६७ धावा केल्या आणि त्याने ३० शतके आणि ६० अर्धशतकेही झळकावली. अ श्रेणीच्या ११३ सामन्यांत त्याने३८.२० च्या सरासरीने ३२८६ धावा केल्या आणि यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीतून ३ शतके आणि २६ अर्धशतकेही झळकावली.

ट्रेंडिंग लेख-

-५ क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पुन्हा केले होते कमबॅक, परंतू झाले सुपर फ्लॉप

-जगभरात भारतासारखे क्रिकेट वेडे फॅन्स शोधून सापडणार नाहीत, जाणून घ्या या पाठीमागची ५ कारणं

-खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र होते हे ४ भारतीय दिग्गज क्रिकेटर, पण नाही मिळाला हा सन्मान

महत्त्वाच्या बातम्या-

-चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता

-इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?

-विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---