मुंबई । आयपीएल -2020 हा युएईमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत प्रथमच या व्यावसायिक लीगमध्ये भाग घेणारे भारतीय युवा क्रिकेटपटू उत्साही असल्याचे दिसते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल बोलीमध्ये, भारतातील पाच युवा क्रिकेटपटूंवर बोली लावली होती. विविध फ्रॅन्चायझींनी मोठी रक्कम खर्च केली करुन त्यांना संघात घेतले. त्यांनंतर हे सर्व खेळाडू चर्चेत Eले. हे तरुण क्रिकेट खेळाडू कोण आहेत हे जाणून घेऊया.
यशस्वी जैयस्वाल
यशस्वीने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या 6 सामन्यात 133.3 च्या सरासरीने एकूण 400 धावा केल्या होत्या. त्याने या स्पर्धेत 4 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले. विजय हजारे स्पर्धेत त्याने दुहेरी शतक झळकावले आहे. आयपीएल 2020 च्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला विकत घेतले.
रवी बिश्नोई
19 वर्षांखालील विश्वचषकात रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी केली. तो आयपीएल 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळेल. रवीचे आयपीएलमधील हे पहिलेच वर्ष असेल जो तो संस्मरणीय बनवू इच्छितो.
ईशान पोरेल
बंगाल संघाला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचविणारा ईशान पोरेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघात घेतले. ईशानकडे दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.
देवदत्त पेडिकक्कल
विजय हजारे वनडे स्पर्धेत व सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत युवा फलंदाज देवदत्त पेडिक्कलने शानदार प्रदर्शन केले. विजय हजारेमध्ये त्याने 11 सामन्यांत 609 धावा केल्या. आयपीएल 2019 मध्ये त्याला आरसीबीने खरेदी केले आहे.
तुषार देशपांडे
तुषार देशपांडे दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील करून घेतले. तो मुंबईकडून खेळतो. आपल्या वेगामुळे तो बर्याचदा चर्चेत असतो.