क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने काही दिवसांपुर्वी यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टी२० विश्वचषक संघाची निवड केली होती. विशेष म्हणजे, त्याने या संघात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला स्थान दिले नव्हते. त्यामुळे चोप्राला सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. Aakash Chopra says how fans abused him after not selecting ms dhoni in indian t20 sqaud.
४२ वर्षीय चोप्राला चाहत्यांनी असे अपशब्द वापरले की त्याला काही दिवसांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर बंद करावा लागला. मागच्या महिन्यात (एप्रिल) चोप्राने भारतीय टी२० विश्वचषक संघाची निवड केली होती. त्याने १४ खेळाडूंच्या या संघात रिषभ पंत आणि केएल राहुल या २ यष्टीरक्षक फलंदाजांची निवड केली होती. मात्र, त्याने धोनीला संधी दिली नाही. कारण त्याला वाटले की ३८ वर्षीय धोनीला पुनरागमन करणे कठीण जाईल.
चोपडाने विचार केला की, त्याचा निर्णय योग्य असेल. कारण, धोनीने २०१९मधील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरी विश्वचषक सामन्यापासून क्रिकेट खेळलेले नाही. परंतु, चोपडाचा हा निर्णय धोनीच्या चाहत्यांना खूप खटकला.
भारताचे माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्यांशी इंस्टाग्राम लाइव्ह चॅटवर बोलताना चोपडाने या गोष्टीचा खुलासा केला. तो म्हणाला की, “मला काही दिवसांसाठी सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करावा लागला होता. लोकांनी मला खूप शिव्या दिल्या आणि हे अपशब्द वापरणे बराच दिवस चालू होते. त्यांनी माझ्या मुलांसोबतही गैरवर्तन केले. त्यामुळे मी त्यांची क्षमा मागून नक्की काय झाले आहे? याची विचारपूस केली होती.”
यावर आगरकर यांनी धोनीच्या क्रिकेट भविष्याबाबतच्या चोपडा यांच्या दृष्टीकोनाला समर्थन दिले आहे. ते म्हणाले की, “मला वास्तव माहीत नाही. धोनीला स्वत: हा निर्णय घ्यावा लागेल की, तो निवृत्ती घेणार आहे की नाही? जर तो त्याच्या योजनेमध्ये बरोबर असेल, तर हे निवडकर्त्यांवर आहे की ते त्याला संधी देतात की नाही?”
“मला नाही वाटत की जो खेळाडू एक वर्षे क्रिकेट खेळला नाही त्याच्यासाठी हे किती अवघड ठरेल. पण माझ्यासाठी धोनीला निवडणे खूप अवघड आहे. धोनी आणि संघ व्यवस्थापकांमध्ये काय बोलणे झाले हे मला माहित नाही. पण एखाद्या विशेष खेळाडूला पुन्हा खेळताना पाहायला मला खूप आवडेल. जर कोणता खेळाडू बऱ्याच दिवसापासून क्रिकेट खेळत नसेल. तर त्याच्याविषयी बोलणे व्यर्थ आहे,” असे आगरकर पुढे म्हणाले.
पण धोनीने अजून निवृत्ती घेतली नसल्यामुळे तो भारतीय संघात पुनरागमन करेल का नाही पाहणे रोमांचक ठरले.
ट्रेंडिंग घडामोडी-
ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम
भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिकलेला क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात केला…





