मुंबई । अफगाणिस्तानचा 26 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज अफसर जजईचा शनिवारी अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आहे. पण सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, त्याच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अफगाणिस्तानचे माजी प्रसारमाध्यम प्रमुख एम. मोहम्मद यांनी या अपघाताचे काही फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केले. जजई यातून लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. या अपघाताचे फोटो पाहताच हा अपघात खूपच भयंकर झाल्याचे दिसून येते.
National cricketer wicket-keeper batsman @AfsarZazai_78 survived in a car accident with a minor injuries in his head but his car damaged most.
May Allah bless you 🙏 get well soon bro. pic.twitter.com/6MJdVSfWzX— M.Ibrahim Momand (@IbrahimReporter) June 20, 2020
जजईने भारताविरुद्ध 2018 साली पहिला कसोटी सामना खेळला होता. मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शेहजादच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. यात त्याला 6 सामने खेळण्याची संधी मिळाली.
2013ला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण करणाऱ्या जजईने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून 17 वनडे आणि 3 कसोटी सामने खेळले आहे. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडीजविरुद्ध लखनऊ येथे नोव्हेंबर 2019 ला खेळला होता.
इतर यष्टीरक्षकांप्रमाणे जजई हा देखील भारताचा यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीला लहानपणापासून आपला आदर्श खेळाडू मानतो. धोनीचा संयम आणि शांत स्वभावाने तो प्रभावित झाला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
बेबी बंपसह विराट-अनुष्काच्या व्हायरल झालेल्या फोटोमागील हे आहे सत्य
सचिन, द्रविड, गांगुली नाही तर हरभजन म्हणतो हा आहे भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू
या क्रिकेटपटूच्या वडिलांनी नैराश्यात येऊन केली होती आत्महत्या