fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका

After IPL 2020 VIVO break Title sponsorship contract with Pro Kabaddi League and Big Boss for Season

August 8, 2020
in IPL, कबड्डी, क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली। मागील महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहेत, तसेच भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. हे पाहता गुरुवारी (६ ऑगस्ट) चीनी स्मार्टफोन कंपनी विव्होने आयपीएल २०२०चे टायटस प्रायोजकत्वावरून स्वत:च माघार घेतली आहे. बीसीसीआयने याची पुष्टी केली आहे.

माध्यमांतील काही वृत्तांंनुसार, विव्होने यावर्षी केवळ आयपीएलमधूनच (IPL) माघार घेतली नसून, प्रो कबड्डी लीग आणि रिऍलिटी शो बिग बॉसच्या टायटल प्रायोजकत्वही सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, विव्हो (VIVO) कंपनीने भारत आणि चीनमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेतला आहे. सोबतच स्पष्ट केले आहे की ते यावर्षी कंपनीच्या ब्रँडिंग आणि प्रमोशनवर अधिक पैसा खर्च करणार नाहीत. त्यांचे संपूर्ण लक्ष हे दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य होण्यापर्यंत विव्होच्या वस्तू रिटेल डिस्काऊंटद्वारे विकण्यावर असणार आहे.

विव्होने प्रो कबड्डी लीगशी करार तोडला 

विशेष म्हणजे विव्होने २०१७मध्ये प्रो कबड्डी लीगच्या टायटल प्रायोजकत्वासाठी स्टार इंडियासोबत ५ वर्षांसाठी (२०१७-२०२१) ३०० कोटी रुपयांमध्ये करार केला होता. कोरोना व्हायरसमुळे २०२०मध्ये कबड्डी लीग रद्द करण्यात आली आहे. अशामध्ये कंपनीने स्टार इंडियाशी असलेला करार रद्द करण्यासाठी संपर्क साधला आहे.

बिग बॉसलाही विव्होने केले बाय-बाय

विव्हो कंपनीने बिग बॉससाठी कलर्स चॅनेलसोबत २०१९ मध्ये २ वर्षांसाठी ६० कोटी रुपयांमध्ये टायटल प्रायोजकत्वाचा करार केला होता.

दरवर्षी प्रमोशनवर १००० कोटी रुपये खर्च करते विव्हो

विव्हो कंपनीने बीसीसीआयशी (BCCI) २१९० कोटी रुपयांचा मोठा करार २०१८- २०२२ या कालावधीसाठी केला होता. दरवर्षी विव्हो ब्रँडिंग आणि प्रमोशनवर १००० कोटी रुपये खर्च करते. ज्यामध्ये दरवर्षी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये आणि १२० ते १५० कोटी रुपये आयपीएल सामन्यादरम्यान खर्च केले जातात.

आयपीएल २०२० मधून विव्हो बाहेर

यावर्षी म्हणजेच आयपीएलचा १३वा हंगाम भारताबाहेर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये आयोजित केला जात आहे. बीसीसीआय आणि व्हिवो यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी एकत्रितपणे २०२० मध्ये ही भागीदारी तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

-ज्याने भारताविरुद्ध दिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून, आज पाकिस्तानने त्यालाच केले वॉटर बॉय

-जॉंटी रोड्सपेक्षाही खतरनाक झेल घेते ही मांजर, सोशल मीडियावर झालीय सुपरस्टार

-हसीन जहांला सोशल मीडियावर येतीय रेपची धमकी, जाणून घ्या कारण

ट्रेंडिंग लेख –

-सलग १००पेक्षाही जास्त वनडे सामने खेळणारे ३ भारतीय लीजंड्स

-खरे अष्टपैलू! वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा व १०० विकेट्स घेणारे भारतीय महारथी…

-संघासाठी वाट्टेल ते! संघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारे ५ निस्वार्थी भारतीय महारथी


Previous Post

आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका

Next Post

सर्फराज अहमद चांगला माणूस असल्यानेच त्याला बूट उचलायला लावले

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and iplt20.com
IPL

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Next Post

सर्फराज अहमद चांगला माणूस असल्यानेच त्याला बूट उचलायला लावले

मातब्बर संघाबरोबरचा भारत दौरा बीसीसीआयने केला रद्द, चाहते झाले नाराज

सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.