अनिल कुंबळे यांनी 23 वर्षांपूर्वी 7 फेब्रुवारी 1999 रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 10 बळी घेऊन इतिहास रचला. ही कामगिरी करणारे ते जगातील दुसरे आणि भारताचे पहिले गोलंदाज ठरले. 1999 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौर्यावर आला होता. त्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा संघ 1-0 ने आघाडीवर होता, पण कुंबळेच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कसोटी जिंकून भारताने मालिकेत बरोबरी साधली.
या सामन्याच्या दुसर्या डावात कुंबळेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 207 धावांवर आटोपला आणि त्यानंतर भारताने सामन्यात 212 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात कुंबळेची 10 विकेट पूर्ण करण्यात माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. याचा खुलासा खुद्द अनिल कुंबळे यांनी केला होता.
अनिल कुंबळेने एका कार्यक्रमादरम्यान कसोटी कारकीर्दीचा हा खास दिवस आठवण सांगताना म्हणाले होते की, “ज्या पद्धतीने तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करीत होता, तेव्हा मला खात्री झाली की मी दहावी विकेट घेईन. टी ब्रेकनंतर मी पाकिस्तानचा 7वी 8वी आणि 9 वी विकेट घेतली. यानंतर माझी ओव्हर संपली आणि श्रीनाथला गोलंदाजी करावी लागली. श्रीनाथसाठी हे षटक टाकणे कदाचित सर्वात कठीण काम होते. तो आपले सर्व कौशल्य विसरून विकेटपासून दूर चेंडू फेकत गोलंदाजी करत होता. माझ्यावर विश्वास ठेवा मी त्याला असे करण्यास सांगितले नव्हते. मी कदाचित दहावी विकेट घ्यावी अशी त्याची इच्छा होती.”
अनिल कुंबळे म्हणाले की, ” पाकिस्तान विरुद्ध 10 बळी घेणे माझ्या नशिबात लिहिलेले होते आणि ते घडले.”
या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नई येथे झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 12 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी कोटला येथे विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिकेत पुनरागमन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चहल अन् वॉशिंग्टनची जोडी ठरली सुपरहिट!! भारतीय खेळपट्टीवर केवळ दुसऱ्यांदाच केलाय असा कारनामा
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
विश्वचषकविजेत्या ‘यंग इंडिया’चा होणार गौरव! बीसीसीआयने केली जंगी तयारी