मार्च २९ पासून सुरू होणारी आयपीएल २०२० स्पर्धा कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आली. पण आता आयपीएलचे १३ वा सत्र यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल. ही स्पर्धा आयोजित केल्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू खूश झाले असणार, पण त्याच बरोबर देशांतर्गत क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटूही अधिक खूश झालेत. खरं तर आयपीएल घरगुती क्रिकेटपटूंना असे व्यासपीठ देते, जिथे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
आयपीएल २०२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून युवा खेळाडू भारतीय संघाचा दरवाजा ठोठावायला तयार आहेत. तर, या लेखात त्या ४ खेळाडूंबद्दल सांगू, जे या मोसमात चांगले प्रदर्शन करू शकतात आणि भारतीय संघामध्ये प्रवेशासाठी जोरदार दावा ठोकू शकतात.
१. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या काही काळापासून देशांतर्गत स्तरावर केलेल्या तुफानी कामगिरीनंतर भारतीय संघामध्ये प्रवेशासाठी दार ठोठावत आहे. त्याने विजय हजारे, देवधर, सय्यद मुश्ताक अली अशा नामांकित स्पर्धेत आपला स्फोटक खेळ दाखविला आहे.
देशांतर्गत क्रिकेट व्यतिरिक्त आयपीएलमध्ये सूर्यकुमारने फलंदाजीत मुंबई इंडियन्ससाठीही चांगली कामगिरी केली आहे. मधल्या फळीसाठी श्रेयस अय्यर, रीषभ पंत सारख्या खेळाडूंचा भारतीय संघाकडे पर्याय असला तरी सूर्यकुमार यादवला संधी देण्याबाबत भारतीय संघाचे संघ व्यवस्थापन विचार करू शकेल.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ७७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने ५३२६ धावा केल्या असून १४ शतके आणि २६ र्धशतके ठोकली आहेत. त्याने अ-श्रेणीतील सामन्यांत २४४७ धावा करत २ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टी-२० स्वरूपात सूर्यकुमाने आतापर्यंत खेळलेल्या १४९ सामन्यांत ३०१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १५ वेळाअर्धशतकांची खेळी केली आहे.
२. कृष्णप्पा गॉथम (Krishnappa Gowtham)
कृष्णप्पा गॉथमने आपल्या देशांतर्गत क्रिकेट संघ कर्नाटककडून खेळताना सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू दरम्यान खेळल्या गेलेल्या सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली आणि सर्वांनाच आपली क्षमता दाखवून दिली.
त्या सामन्यातील शेवटच्या षटकात तमिळनाडूला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. तेव्हा गौतमने १४ धावांचा बचाव करण्यासाठी शानदार गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एका धावांनी विजेतेपद मिळवून दिले.
या खेळाडूने आपल्या कामगिरीने आयपीएल २०१८ मध्ये प्रत्येकाला चकित केले. राजस्थान रॉयल्सने त्याला ६.२० कोटीमध्ये खरेदी केले. परंतु, सध्या हा खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाबमधून खेळताना दिसणार आहे.
कृष्णप्पा गॉथमने आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल. तो हा महान गोलंदाज किंवा फलंदाज नसला तरी तो अष्टपैलू भूमिका नक्की बजावू शकतो. तो लोअर ऑर्डरचा फिनिशर म्हणून काम करू शकतो आणि आवश्यकतेनुसार चांगली फिरकी गोलंदाजीही करू शकतो.
३. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma)
फिरकी गोलंदाज अभिषेक शर्मा देखील आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघामध्ये प्रवेश करू शकतो. अभिषेकने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९ प्रथम श्रेणी, २१ अ दर्जाचे सामने आणि १५ ट्वेंटी२० सामने खेळले आहेत.
त्याने प्रथम श्रेणीमध्ये ३५८ धावा आणि ८ बळी, अ दर्जाचे सामन्यांत ३६० धावा आणि ५ बळी घेतले आहेत. तसेच ट्वेंटी२०मध्ये २८६ धावा ५ बळी घेतले आहेत.
हा खेळाडू आयपीएल २०१७ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा भाग झाला. परंतु त्यानंतर ट्रेडिंगच्या माध्यमातून तो सन २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात आला. परंतु, आतापर्यंत त्याला पुरेशा संधी मिळालेली नाही.
या युवा खेळाडूला पुढे संधी मिळाल्यास भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्याची क्षमता त्याच्यात आहे. अभिषेकचे वैशिष्ट्य म्हणजे तो संघात गोलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करतो आणि जर तो भारतीय संघाचा भाग बनला तर तो सलामीच्या जोडीमध्ये लेफ्ट एंड राइट असं समीकरण बनवू शकतो. तो डावकरी अष्टपैलू खेळाडू आहे.
४. यशस्वी जयस्वाल (Yashvi Jaiswal)
२०२० मधील १९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने सर्वाधिक धावा केल्या. यशस्वीने देशांतर्गत पातळीवरही शानदार प्रदर्शन करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवा खेळाडू यशस्वी जयस्वालच्या देशांतर्गत कामगिरीकडे पाहता आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघासाठी त्याला खरेदी केले. डावखुरा फलंदाज यशस्वीकडून आता सर्वांची अपेक्षा आहे की त्याने चांगली कामगिरी केली तर तो भारतीय संघामध्ये पदार्पण करू शकेल.
वास्तविक यशस्वी डावखुरा सलामीवीर आहे, जो गरज भासल्यास संघासाठी गोलंदाजीही करू शकतो. अशा परिस्थितीत आयपीएल २०२० मध्ये जर चांगली कामगिरी बजावली तर ह्या डावखुऱ्या फलंदाजाला भारतीय संघात सामील व्हायला वेळ लागणार नाही.
ट्रेंडिंग लेख-
-असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
-५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
-‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
महत्त्वाच्या बातम्या-
-‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित
-कुलदीप यादवच्या वर्कआउटचा व्हिडिओ पाहून फॅन्स झाले हैराण; मात्र धवनने केले ट्रोल
-२०२२ च्या विश्वचषकात खेळणार का? झुलन गोस्वामी म्हणाली…