राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये बेन स्टोक्सविना या हंगामाची सुरुवात करणार आहे. आयपीएलच्या सुरूवातीला तो काही सामने खेळणार नाही. तो आपल्या वडिलांसोबत न्यूझीलंडमध्ये थोडा वेळ घालवेल असे वृत्त आहे.
एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की न्यूझीलंडमधील क्वारंटाईन नियमांनुसार बेन स्टोक्सने तिथे 14 दिवस पूर्ण केले आहेत. तो आपल्या वडिलांसह आणि कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवेल. त्यानंतर त्याला काही काळ युएईत क्वारंटाईन रहाणे लागणार आहे. याक्षणी ही प्राथमिकता नाही, म्हणून फ्रेंचायझीने त्याला यायलाही सांगितले नाही. त्याला त्याच्या कुटुंबासमवेत वेळ घालवू द्या आणि त्यांची उपलब्धता नंतर कळेल, असे फ्रचांईजीचे म्हणणे आहे.
बेन स्टोक्सने पाकिस्तानविरुद्धची मालिका सोडली
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बेन स्टोक्सने आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील ब्रेन कॅन्सर झालेले न्यूझीलंडचे माजी रग्बी खेळाडू आहेत. यावर तो म्हणाला की, “माझ्या वडिलांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर मला बरेच दिवस रात्री झोप लागत नव्हती.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून ७ हजारपेक्षा जास्त धावा आणि 200 हून अधिक बळी घेतले आहेत.
आयपीलमधील बेन स्टोक्सची कामगिरी खास राहिला नाही. त्याने 34 सामन्यात 635 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 26 बळीही घेतले आहेत. तो राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमधील हा अष्टपैलू खेळाडू काही सामन्यांमधून बाहेर झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा नक्कीच नुकसान होईल. युएईमध्ये आयपीएल खेळायला तो केव्हा परत येईल आणि कसा कामगिरी करेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.