जगात खेळवण्यात येणाऱ्या टी-२० क्रिकेट लीगमधील सर्वोत्तम पहिल्या पाच लीगमधील एक असलेल्या कॅरेबीयन प्रिमियर लिग २०२० ला आजपासुन त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या सामन्याने त्रिनिदाद व टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट मैदानावर सुरुवात होत आहे. यावेळेस ब्रायन लारा मैदान व क्विन्स पार्क ओव्हल या दोन मैदानावरच संपुर्ण स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत खेळविण्यात येणाऱ्या एकूण ३३ सामन्यांपैकी २३ सामने ब्रायन लारा मैदानावरच खेळवले जाणार आहेत. त्यात उपांत्य व अंतिम सामन्यांचाही समावेश आहे.
यापुर्वी या मैदानावर सीपीएलचे ८ सामने खेळवले गेले आहेत आणि त्यात त्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सर्वाधिक सहभाग होता. त्रिनबॅगो नाईट रायडर्सने येथे खेळवलेल्या ६ सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवला आहे.
या मैदानाचा इतिहास पाहता या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहते. त्यामुळे कर्णधार फिरकी गोलंदाज किंवा मध्यम गती गोलंदाजांकडुनच सर्वाधिक षटके टाकुन घेतो. तसेच आतापर्यंत या मैदानावर कोणत्याही संघाला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. या मैदानाचा इतिहास पाहता प्रथम फलंदाजी व धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाला समान यश मिळाले आहे.
ब्रायन लारा मैदान,तरौबा
सीपीएल सामने – ८
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने -४
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जिंकलेले सामने – ४
सर्वाधिक धावसंख्या – १७१/६
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या – १५७