५ सप्टेंबरला जमैका तलावह आणि बार्बाडोस ट्रिडेंट्स संघात सीएपीएलमधील २८ वा सामना पार पडला हा सामना ट्रिडेंट्सने ७ विकेट्सने जिंकला. या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली आहे.
या सामन्यात ट्रिंडेंसचा संघ १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना १५ व्या षटकात मिशेल सँटेनरने जमैकाच्या संदीप लामिछानेच्या गोलंदाजीवर षटकार मारला. या षटकाराचा चेंडू लाँगऑनला स्टँड्समध्ये गेला. पण कोरोना व्हायरसमुळे स्टँड्समध्ये प्रेक्षक नसल्याने जमैकाच्या कार्लोस ब्रेथलेटला तो चेंडू शोधायला स्वत: स्टँड्समध्ये जावे लागले.
यावेळी स्टँड्समध्ये सीपीएल प्रशासनाने प्रेक्षकाचे पोस्टर लावले आहेत, जेणेकरुन खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. पण सँटेनरने मारलेला षटकाराचा चेंडू त्या प्रेक्षकांच्या पोस्टरमध्ये गेला असल्याने तो शोधण्यास ब्रेथवेटला बरीच मेहनत करावी लागली. सध्या ह्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Some one please help @TridentSportsX find the ball 😋😂😂😂 #CPL20 #CricketPlayedLouder pic.twitter.com/Gjlka69rZG
— CPL T20 (@CPL) September 5, 2020
या सामन्यात सँटेनरने नाबाद ३५ धावा केल्या. तर कर्णधार जेसन होल्डरने ६९ धावा केल्या आणि जोनाथन कार्टरने ४२ धावा केल्या. त्यामुळे ट्रिडेंट्सने हा सामना सहज जिंकला. तरी हा सामना जिंकला असला तरी या स्पर्धेतील ट्रिडेंट्सने आव्हान संपले आहे. मात्र जमैकाने उपांत्यसामन्यात प्रवेश केला आहे. त्यांना उपांत्य फेरीचा सामना ८ सप्टेंबर त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचा उद्धाटनाचा सामना कायमच असतो खास, पहा काय सांगताय आकडेवारी
मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माला केले जसप्रीत बुमराहने पराभूत, मुंबईने शेअर केला व्हिडिओ
रागात मारलेला एक चुकिचा फटका पडला तब्बल २२ कोटींना
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणारे ५ क्रिकेटर्स; या भारतीयांचा आहे समावेश
फलंदाजाच्या कानाजवळून ‘झूप’ असा आवाज करत गोलंदाजी करणारे ३ आयपीएल स्टार
कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज