---Advertisement---

डेविड वाॅर्नरचा साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स, या सुपरस्टारने मानले आभार

On: सोमवार, मे 4, 2020 6:53 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर हा आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैद्राबादने २०१६मध्ये आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. वॉर्नर बऱ्याच वर्षांपासून हैद्राबादचे नेतृत्व करत आहे आणि या कारणामुळे त्याला हैद्राबादशी संबंधित गोष्टींमध्ये रसही आहे.

वार्नरने काही दिवसांपुर्वी त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नरसोबत मिळून एका तेलुगु गाण्यावर डान्स केला होता. त्याने डान्सचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत वार्नर त्याच्या पत्नीसोबत मिळून ‘बुट्टबम्मा’ या तेलुगु गाण्यावर डान्स करत आहेत. दरम्यान त्यांची मुलगी मधे-मध्ये येऊन नाचताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, वॉर्नरने आपल्या सनराइजर्स हैद्राबाद संघाची जर्सी घालून हा डान्स केला आहे. त्याने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “ही टिकटॉकची वेळ आहे, आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडा.”

https://www.instagram.com/p/B_mINrppW7d/?utm_source=ig_embed

 

वॉर्नर आणि त्याच्या पत्निने मिळून ज्या तेलुगु गाण्यावर डान्स केला आहे ते गाणे मुळात दाक्षिणात्त्य अभिनेता अल्लू अर्जुन याचे आहे. हे गाणे एस थमन यांनी लिहिले आहे. युट्यूब, टिक टॉकवरती या गाण्याचा खूप ट्रेंड चालू आहे.

वॉर्नरने या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अल्लु अर्जुननेही ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. Allu arjun commented on david warner’s dance on telugu song.

 

याला प्रत्युत्तर देत, वॉर्नरने ट्विट करत म्हटले की, “हे गाणे खूप शानदार आहे, धन्यवाद सर.”

 

वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १२६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४३.१७च्या सरासरीने एकूण ४७०६ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १४२.३९ इतका होता. तसेच, यामध्ये त्याच्या ४ शतकांचा आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

पोलार्ड, मलिंगासह परदेशी खेळाडूंशिवाय अशी होईल जबरदस्त मुंबई इंडियन्स

वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यत चेंडूंमध्ये झालेले बदल

मुरली विजयबरोबर डेटवर जाण्यासाठी तयार आहे ही सुंदर क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---