---Advertisement---

डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 3:02 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरची पत्नी कँडिसने गुरुवारी (१९ नोव्हेंबर) आपल्या मुलांच्या आवडत्या क्रिकेटपटूंबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की, त्यांच्या मधव्या मुलीला स्वत:चे वडील किंवा ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू आवडत नाही. परंतु तिला भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू खूप आवडतो.

भारतीय क्रिकेट संघातील आपल्या म आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगताना कँडिसने कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले. वॉर्नर आणि कँडिसला तीन मुली आहेत. त्यातील मोठी मुलगी इवी मे ही ६ वर्षांची आहे. मधवी मुलगी ४ वर्षांची असून तिचे नाव इंडी रे आहे, तर तिसऱ्या मुलीचे नाव इसला रोझ असून तिचे वय १ आहे.

कँडिसने नुकतेच एका रेडिओ शोमध्ये याबाबत चर्चा केली होती. ती म्हणाली होती की, जेव्हाही मुलं वॉर्नरसोबत घराच्या मागे क्रिकेट खेळायचे, तेव्हा ते म्हणायचे की त्यांना विराट कोहलीप्रमाणे बनायचंय.

कँडिसचे वक्तव्य
“आम्ही घराच्या मागे क्रिकेट खेळतो. मजेशीर बाब अशी की माझ्या मुलीही कधी- कधी वडील बनतात. कधी- कधी त्यांना ऍरॉन फिंच बनायचे आहे. परंतु माझ्या मधव्या मुलीला विराट कोहलीप्रमाणे बनायचे आहे. मी चेष्टा करत नाही. तिचा आवडता क्रिकेटपटू हा विराट कोहलीच आहे,” असे तिने सिडनीतील एका रेडिओ स्टेशनमध्ये बोलताना म्हटले.

https://twitter.com/TripleMSydney/status/1329195811750641666

तिने पुढे हेही सांगितले की, वॉर्नर आपल्या मुलींसोबत क्रिकेट खेळताना आपली प्रतिस्पर्धी भावना कायम ठेवतो.

शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) होईल वनडे मालिकेला सुरुवात
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील येत्या वनडे मालिकेसाठी स्टेडिअममध्ये कुटुंबातील व्यक्तींना येण्याची परवानगी दिली, तर वॉर्नरच्या मुलीला विराटला भेटायला किंवा पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये २७ नोव्हेंबरपासून ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिकांना सुरुवात होणार आहे.

काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आधीच सिडनीच्या जैव- सुरक्षित वातावरणात प्रवेश केला आहे. इतर खेळाडूही लवकरच सिडनी येथे पोहोचतील.

वॉर्नरची आयपीएल २०२०मधील कामगिरी
वॉर्नरने नुकतेच युएईत आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

वॉर्नरने आयपीएल २०२०मध्ये १६ सामने खेळले. त्यात त्याने ३९.१४ च्या सरासरीने ५४८ धावा केल्या. यामध्ये ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार

दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह

विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे

ट्रेंडिंग लेख-

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---