भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्माशी मंगळवारी (२२ डिसेंबर) लग्नगाठ बांधली. हा विवाह सोहळा गुरुग्राम येथे संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने ८ ऑगस्टला साखरपुडा केला होता.
लग्नाची माहिती चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. लग्नाच्या दुसर्याच दिवशी धनश्रीने चहल सोबत केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनीही या फोटोंना पसंती दर्शविली आहे.
धनश्रीने हे फोटो शेअर त्याला हटके कॅप्शनसुद्धा दिले आहे. ‘सगळ्याच गोष्टी अतिशय सुंदर होत्या….साखरपुड्याचा दिवस’, असे तिने फोटो पोस्ट करताना लिहिले आहे. या फोटोंमध्ये चहल आणि धनश्री मनमोकळेपणे हसत असल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे दोघांच्या हातातील अंगठी देखील यात दिसते आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CJJGX97lYcN/?utm_source=ig_web_copy_link
चहलची पत्नी धनश्री वर्मा एक प्रसिध्द युट्यूबर आहे. आपल्या चॅनलवर प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यांना नव्या ढंगात सादर करत असते. तिच्या नृत्याच्या व्हिडिओंनाही चाहते नेहमीच पसंत करत असतात. तिची स्वतःची एक नृत्य संस्था देखील आहे.
त्याचवेळी चहलबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या सामन्यांतील तो आघाडीचा फिरकीपटू आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे आणि टी-२० सामन्यांत त्याने दमदार कामगिरी केली होती. पहिल्या टी-२० सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या:
– ठरलं तर! २०२१ च्या आयपीएलमध्ये मिस्टर आयपीएल रैना करणार चेन्नईचे प्रतिनिधित्व
– IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारत करणार पाच बदल? अशी असेल संभावित प्लेईंग इलेव्हन
– आयएसएल २०२०: गोव्याचा जमशेदूपरवर दिमाखदार विजय; अँग्युलोच्या दोन गोलांचे मोलाचे योगदान