---Advertisement---

८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळवेल

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 9:26 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानिमित्त हा खास किस्सा.

क्रिकेटपटू व त्यांची गाजलेली वाक्य ही कायमचं क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. अनेक क्रिकेटपटूंची काही वाक्य अजरामरही झाली आहेत. असंच एक वक्तव्य २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिविलियर्सने केलं होतं.

‘भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जरी 80 वर्षाचा झाला तरी त्याला माझ्या संघात खेळवेल’ असे त्यावेळी एबी डिविलियर्स म्हणाला होता.

डेविलियर्स धोनीबद्दल म्हणाला होता, “तूम्ही लोक मजेशीर आहात. मी एमएस धोनीला प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक दिवशी माझ्या संघात खेळवेल. तो जरी 80 वर्षाचा झाला आणि व्हिलचेअरवर असला तरी तो माझ्या संघात खेळू शकतो.”

“तो अफलातून आहे. म्हणजेच त्याच्या विक्रमांकडे बघा. तूम्हाला अशा खेळाडूला वगळायचे आहे? तूम्ही असे करु शकता. मी नाही.”

धोनीने भारताकडून वनडेत ३५० वनडे, ९८ टी२० व ९० कसोटी सामने खेळले आहे. धोनीने कसोटीतून २०१४मध्येच निवृत्ती घेतली असून शेवटचा वनडे सामना तो ९ जुलै २०१९ रोजी खेळला आहे.

धोनीचे सध्या सर्व लक्ष हे टी२० विश्वचषक व आय़पीएल यांच्याबद्दल काय होते याकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment