मुंबई । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) मालिकेत चेंडू चमकविण्यासाठी क्रिकेटपटूंना मान, चेहरा आणि डोक्याच्या घामाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तथापि, खेळाडू बॉल चमकविण्यासाठी पोट आणि पाठीचा घाम वापरू शकतात.
संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क म्हणतो की, “चेंडूला चमकविण्यासाठी चेहर्यावरच्या घामाचा वापर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये करण्यास बंदी घातल्यास काही फरक पडणार नाही, परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा चेंडू चमकू लागतो तेव्हा आपण त्यावर लाळ लावून चेंडू सुकवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.”
इंग्लंडच्या खेळाडूंनी घामाचा वापर केला
तो म्हणाला की,” वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत, इंग्लंडच्या गोलंदाजांना पाठ आणि चेहर्यांवरील घामाचा वापर करताना पाहिले. चेंडू चमकण्यासाठी जोफ्राने त्याच्या पाठीचा घाम वापरला.”
“कोरोनाची परिस्थिती अशीच राहिल्यास ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत हंगामात असे नियम लागू होऊ शकतात,” असे स्टार्कने सांगितले.