---Advertisement---

कोरोना पाॅझिटिव्ह खेळाडू, रैनाची माघार व वाद यावर बीसीसीआय काय म्हणतेय पहा

---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. हा मोसम यावेळी युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता यावर्षीचा आयपीएल हंगाम युएईला आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व संघ दुबईला पोहचले आहे. परंतु या दरम्यान खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे सर्वांचे लक्ष आहे.

अशातच चेन्नई सुपर किंग्स संघातील १३ सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. या १३ जणांमध्ये दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचाही समावेश आहे. त्यातच सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैनाने यावर्षीच्या आयपीएलमधून वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे. त्याने हा निर्णय कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला असल्याचाही अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

त्यामुळे या गोष्टी लक्षात घेत आज कोरोना व्हायरसच्या चाचणी बाबतीत बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की बीसीसीआयने आयपीएल २०२०च्या हंगामासाठी आरोग्य व सुरक्षिततेचे नियम कडक ठेवले आहेत.

प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की ‘ युएईमध्ये पोहचल्यानंतर, सर्वजणांची अनिवार्य चाचणी करण्यात आली आणि त्यांना क्वारंटाईनही करण्यात आले. युएईमध्ये आलेल्या सर्व सहभागी सदस्यांच्या मिळून २० ते २८ ऑगस्ट दरम्यान एकूण १९८८ आरटी-पीसीआर कोविड चाचण्या घेण्यात आल्या. या सदस्यांमध्ये खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापक, बीसीसीआय स्टाफ, आयपीएल ओपरेशन टिम, हॉटेल आणि ग्राऊंड सपोर्ट स्टाफचा समावेश आहे.’

तसेच आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्याबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात २ खेळाडूंचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सदस्यांना अन्य संघ सदस्यांपासून वेगळ ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आयपीएल मेडिकल टीमचे लक्ष असेल.’

याबरोबर यापुढेही नियमितपणे सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात येईल असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चेंडूला स्विंग हवाय; मग वापरा पोट व पाठीचा घाम, या क्रिकेट बोर्डाने काढला अजब नियम

भारतीयांसाठी व्हिलन ठरलेला माजी क्रिकेटर म्हणतोय, धोनी ५० वर्षातील सगळ्यात भारी कर्णधार

एकेवेळी शाळेची फी भरायला पैसे नसलेला क्रिकेटर झालाय करोडपती, आयपीएलमध्ये करतो…

ट्रेंडिंग लेख –

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---