---Advertisement---

पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता ‘सेक्सोफोन’

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 12:43 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोना विषाणूमुळे बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंड विरुद्ध मॅंचेस्टर येथे पहिला कसोटी सामना खेळला. मात्र, या सामन्यात यजमान संघासमोर पाकिस्तान संघाला 3 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. कोरोना व्हायरसमुळे जैविक वातावरणात ही मालिका खेळली जात आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाही. आपल्या आवडत्या संघाला चीअर अप करण्यासाठी चाहते प्रतिक्षा करीत आहेत. परंतु इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात ब्रिटनमधील एक पाकिस्तानी चाहता आपल्या संघाला चिअर अप करत होता. त्या चाहत्याला मैदानाबाहेरून चिअर अप करण्यापासून कुणीच रोखू शकले नाही.

सामन्याच्या चौथ्या दिवशी एक पाकिस्तानी चाहता ओल्ड ट्रॅफर्डबाहेर सॅक्सोफोन वाजविताना दिसला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर साऊथॅंम्पटनमध्ये खेळल्या जाणार्‍या मालिकेच्या दोन्ही सामन्यांवर पाकिस्तानची नजर आहे. दुसरा कसोटी 13 ऑगस्टपासून आणि तिसरा कसोटी 21 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.

https://twitter.com/imeerhamza/status/1292462086858117121

कसोटी मालिकेनंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका पाहण्यासाठीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---