आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज नवे विक्रम बनतात आणि मोडले जातात. या विक्रमामुळे प्रत्येक दिवशी क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला जातो. आजकाल तर वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पडत आहे. यातील काही विक्रम खास असतात जसे की सचिन तेंडुलकर यांच्या शतकांचे शतक, अनिल कुंबळे यांचे एका डावात दहा विकेट घेणे अशा अनेक विक्रमाने क्रिकेटचे पुस्तक भरले आहे.
पण असाही विक्रम आहे जो प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत महत्त्वाचा आहे. काही क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीत कधीच शून्य धावसंख्येवर बाद झाले नाहीत. अशाच पाच क्रिकेटपटूंची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जे वनडे क्रिकेटमध्ये कधीच शून्यावर बाद झाले नाहीत.
५. जॅक रुडोल्फ –
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक रुडोल्फने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 45 वनडे सामने खेळला आहे आणि 39 डावांमध्ये 1174 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 7 अर्धशतकेही केली आहेत आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे. पण या त्याच्या वनडे कारकिर्दीत रुडॉल्फ कधीही शून्यावर बाद झाला नाही.
४. पीटर कर्स्टन
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक खेळाडू आहे. पीटर कर्स्टनने 1991 ते 1994 दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना 40 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 1293 धावा केल्या. यावेळी त्याने 9 अर्धशतके झळकावली आणि त्यांची सर्वाधिक धावसंख्या 97 अाहे. वनडे कारकीर्दीत कर्स्टन देखील कधीही शून्यावर बाद झाला नाही.
३. यशपाल शर्मा
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि 1983 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचाही या यादीत समावेश आहे. ते 1978 ते 1985 पर्यंत भारतीय संघाकडून खेळले. यावेळी यशपाल शर्माने 42 वनडे सामन्यांच्या 40 डावात 883 धावा केल्या, ज्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 89 धावा होती. यशपाल यांनी कारकीर्दीत एकूण 4 अर्धशतके झळकावली आणि तेदेखील कधीही शून्यावर बाद झाला नाही.
२. मॅथ्यू क्रॉस
स्कॉटलंडचा खेळाडू मॅथ्यू क्रॉसने 2014 ते 2019 दरम्यान एकूण 52 वनडे सामने खेळले. त्याने एकूण 48 डावांमध्ये 1136 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली पण तोही कधीही शून्यावर बाद झाला नाही.
१. केपलर वेसल्स
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांकडून खेळणारे केपलर वेसेल्स यांचा या यादीत पहिला क्रमांक आहे. 100 पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही वेसेल्स कधीही शून्यावर बाद झाले नाही. 1983 ते 1994 दरम्यान केपलर वेस्ल्सने 109 वनडे सामन्यांच्या 105 डावांमध्ये 3367 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 1 शतक आणि 26 अर्धशतके झळकावली.
वाचनीय लेख –
क्रिकेटबरोबर इतर खेळातही भारताचे नाव रोषण करणारे ३ महान क्रिकेटर





