---Advertisement---

जुना धोनी परतला, पहा कशामुळे चाहत्यांना दिसला जुना धोनी क्रिकेट मैदानावर

---Advertisement---

मुंबई । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह आहे. कोरोनाव्हायरसपूर्वी धोनी चेन्नई सुपर किंग्ज शिबिरात सराव करत होता. आता मोठ्या ब्रेकनंतरही तो त्याच स्वरुपात दिसला आहे. दुबईला रवाना होण्यापुर्वी चेपॉकच्या मैदानात सराव करताना मोठे मोठे षटकार मारताना दिसून आला.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, “धोनी चांगली फलंदाजी करतोय. तो सर्वत्र षटकार मारत होता. तो नेहमीप्रमाणे आत्मविश्वासू आणि आनंदी दिसत होता. संघातील खेळाडूंनाही इंस्टाग्रामवरून धोनीच्या निवृत्तीबद्दल कळले आणि त्यांनाही आश्चर्य वाटले.”

https://twitter.com/DHONIism/status/1296278988449406977

19 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयपीएलसाठी सीएसके संघ शुक्रवारी दुपारी युएईला रवाना झाला. चेन्नईत झालेल्या शिबिराबद्दल सीईओ म्हणाले की, “खेळाडूंना त्याची गरज आहे. ब्रेक नंतर त्याला  वॉर्म अप करण्याची संधी मिळाली आहे, यामुळे दुखापतीची शक्यता कमी होते. मला वाटते की एम विजय आणि ऋतुराज गायकवाड चांगले खेळत आहेत. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---