कोरोना व्हायरसदरम्यान सुरू झालेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमधील ८वा सामना काल (२२ ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडिअम, त्रिनिदाद येथे गयाना अमेझॉन वॉरिअर्स आणि जमैका तलावाह्ज संघात पार पडला होता. हा सामना गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाने १४ धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाने १९.१ षटकात सर्वबाद ११८ धावा केल्या होत्या. वॉरिअर्सने दिलेल्या ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जमैका तलावाह्ज संघाला ७ बाद १०४ धावाच करता आल्या. तलावाह्ज संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलने नाबाद सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ५ षटकारही ठोकले. त्याचबरोबर कर्णधार रोव्हमन पॉवेलने २३ धावा आणि असीफ अलीने १४ धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार ख्रिस ग्रीनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. सोबतच इम्रान ताहिर, अशमेड नेड, नवीन उल हक, कीमो पॉल आणि चंद्रपॉल हेमराज यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे. सोबतच चंद्रपॉल हेमराज आणि रॉस टेलरने प्रत्येकी २१ धावा केल्या, तर नवीन उल हकने १४ धावा केल्या. कर्णधार ख्रिस ग्रीनसहित इतर फलंदाजांना २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
जमैका तलावाह्ज संघाकडून गोलंदाजी करताना मुजीब उर रहमान आणि कार्लोस ब्रेथवेटने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर संदीप लामिछानेने २ विकेट्स, तर रसलने १ विकेट घेतली.
विशेष म्हणजे गयाना अमेझॉन वॉरिअर्स संघाने दिलेले आव्हान हे सीपीएल इतिहासातील सर्वात कमी धावांचे आव्हान होते. परंतु तेदेखील जमैका तलावाह्ज संघाला पार करता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-सुनिल नरेन एक्सप्रेस काही थांबेना, धडाकेबाज कामगिरी करत नाईट रायडर्सला दिला शानदार विजय
-जुना धोनी परतला, पहा कशामुळे चाहत्यांना दिसला जुना धोनी क्रिकेट मैदानावर
-दोन दिवसांपासून गर्विष्ठ म्हणणाऱ्या लोकांना दिले विराटने दिले सडेतोड उत्तर
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…






