इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी टी२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय लय राखणारा फलंदाज डेव्हिड मलानची प्रशंसा केली व तो सतत चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितले आहे.
इंग्लंडकडून २०१७ मध्ये पदार्पण करणाऱ्या मलानने खेळाच्या टी२० क्रिकेटमध्ये १४ सामन्यात १ शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो मोठ्या लयीत आहे.
त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना हुसेन म्हणाला, “टी२० क्रिकेटमध्ये तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. टी२० एक असे स्वरूप आहे जिथे कामगिरीमध्ये सातत्य राखणे सोपे नाही, कारण आपल्याला पटकन मोठे फटके खेळावे लागतात. तो सातत्याने अविश्वसनीय कामगिरी करत आहे.”
“त्याच्यात ही चांगली गोष्ट आहे की तो जास्त जोरात फटके खेळत नाही. आपल्याला तो अंदाधुंद फटके खेळताना दिसणार नाही. फटक्यांवर त्याचे चांगले नियंत्रण आहे,” असेही यावेळी हुसेन म्हणाला.
१४ सामन्यात ६१९ धावा
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १४ सामन्यांत ५१.५८ च्या सरासरीने ६१९ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईकरेट १४९.१५ इतका जबरदस्त राहिला आहे. या कामगिरीचा अंदाज लावला जाऊ शकतो की तो किती सातत्यपूर्ण खेळाडू आहे.
अशी आहे त्याची कारकीर्द (सामन्यानुसार कामगिरी)
७८, ५०, १०, ५९, ५३, ११, ३९, ५५, १०३*, ११, २३, ५४*, ७, ६६ धावा.
पाकिस्तानविरुद्ध गेल्या आठवड्यात नाबाद ५४ धावा करणाऱ्या या फलंदाजाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४३ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. इंग्लंडने हा सामना दोन धावांनी जिंकला.