ऍडलेड येथे १७ डिसेंबरपासून दिवस- रात्र सामन्याने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाहुण्या भारतीय संघाची दयनीय अवस्था केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाने दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांवर आपला डाव घोषित केला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अत्यंत मजेशीर पद्धतीने भारताच्या दुसऱ्या डावाचे धावफलक दाखवले.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची आकडेवारी
भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर पृथ्वी शॉने ४ धावा आणि मयंक अगरवालने ९ धावा केल्या. मागील पहिल्या डावात कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराची फलंदाजी सुमार राहिल्यामुळे जसप्रीत बुमराहला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण कर्णधार विराट कोहलीचा हा डावपेच फसला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला फक्त २ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजीला आलेला पुजारा तर भोपळाही फोडू शकला नाही.
पुजाराव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन हे दोघेही शून्य धावांवर बाद झाले, तर विराट कोहली (४ धावा), हनुमा विहारी (८ धावा), वृद्धिमान साहा (४ धावा), उमेश यादव (४ धावा) यांनीही लवकरच पव्हेलियनचा रस्ता धरला. कमिन्सच्या २१ धावांवर ४ विकेट्स आणि जोश हेजलवूडच्या ८ धावांवर ५ विकेट्सच्या कामगिरीचा यात मोठा वाटा राहिला.
बीसीसीआयने गमतीशीर पद्धतीने नोंदवल्या धावा
त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावातील सुमार धावसंख्येची बीसीसीआयने अनोख्या पद्धतीने नोंद केली. त्यांनी धावफलकावर शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंपुढे बदक या पक्षाचे चिन्ह दिले. शून्य धावेवर विकेट गेल्यानंतर इंग्रजी भाषेत लिहिताना त्याला गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर) आणि सिल्वर डक (दुसऱ्या चेंडूवर) असे म्हणतात. यानुसार बीसीसीआयने या चिन्हाचा वापर केला असावा.
No-one in double figures yet…#AUSvIND pic.twitter.com/6w1mDukmm4
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2020
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केला सामन्याचा कायापालट
पाच दिवसीय गुलाबी चेंडू सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ आघाडीवर होता. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलिया संघापुढे २४५ धावांचे आव्हान ठेवले होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागातील सांघिक कामगिरीमुळे भारताच्या वाट्याला हे सुख आले होते. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पूर्ण वचपा काढला. तसेच भारताला ४० धावांचा आकडाही गाठू न देता डाव घोषित करण्यास प्रवृत्त केले. आता विजयासाठी ऑस्ट्रेलियाला फक्त ९० धावा कराव्या लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
..म्हणून मॅथ्यू वेडला सलामीला पाठवणे पडले महागात, माजी ऑस्ट्रेलियन कॅप्टनने सांगितले कारण
‘हे’ आकडे एकदा पाहा… संपूर्ण जग २०२० ला विसरेल पण भारत नाही विसरणार
हाउज द जोश..!! भारतीय फलंदाजांना लोळवणाऱ्या हेजलवूडने केलाय ‘हा’ मोठा पराक्रम






