तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता भारतीय संघाला ३ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करायचा आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (४ डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानावर खेळला जाणार आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो? याबाबत आपण जाणून घेऊया.
सलामीला शिखर धवनसोबत दिसू शकतो केएल राहुल
विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघासाठी टी२० मालिकेत सलामीवीर म्हणून शिखर धवनसोबत केएल राहुल दिसू शकतो. कारण टी२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून राहुलची आकडेवारी जबरदस्त आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्वत: कर्णधार विराट असेल. विराटने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनला खेळवले, तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडेमध्ये शर्यत पाहायला मिळू शकते.
सहाव्या क्रमांकावर असेल हार्दिक पंड्या
सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या असेल, तर सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाची जागा पक्की असल्याचे म्हटले जात आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर भारतीय संघ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरसोबत मैदानावर उतरू शकतो. तरीही, विराट कोहली गोलंदाजी विभागात शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांनाही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करेल. आणि इतर गोलंदाजाला बाहेर करेल.
ऑस्ट्रेलियासमोर सलामीची चिंता
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघासमोर सलामी विभागाबाबत चिंता असेल. कारण डेविड वॉर्नर टी२० मालिकेचा भाग नाही. अशामध्ये ऍरॉन फिंचसोबत सलामीची जबाबदारी मार्कस स्टॉयनिसला सांभाळावी लागेल किंवा स्टीव्ह स्मिथही डावाची सुरुवात करू शकतो. याव्यतिरिक्त मधल्या फळीत आणि यष्टीरक्षकाची निवडही कर्णधार ऍरॉन फिंचसाठी चिंतेचा विषय आहे. कारण मॅथ्यू वेड आणि ऍलेक्स कॅरे दोघेही फॉर्ममध्ये आहेत.
भारताचा संभावित प्लेईंग इलेव्हन संघ
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर
ऑस्ट्रेलियाचा संभावित प्लेईंग इलेव्हन संघ
ऍरॉन फिंच (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, डॉर्सी शॉर्ट, मोईसेस हेन्रीक्स, पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड आणि ऍडम झाम्पा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव