इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम सुरु होण्यास आता जवळपास २ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. अशात काल (६ सप्टेंबर) बीसीसीआयने आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १९ सप्टेंबर रोजीचा पहिला सामना अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. ५३ दिवस चालणाऱ्या या टूर्नामेंटचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येईल.
आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात, आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांपैकी केवळ २ संघ असे आहेत, ज्यांना एकाही हंगामात पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर उर्वरित सर्व संघांनी कमीत कमी एकदा तरी आयपीएलचा पहिला सामना खेळला आहे. 2 IPL Teams Which Never Played First Match Of IPL
किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स हेच ते २ संघ आहेत, ज्यांच्या नशिबी आयपीएलच्या १२ हंगामांपैकी एकाही हंगामातील पहिला सामना आला नाही. याउलट, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध खेळताना तब्बल ३ वेळा आयपीएल हंगामाची सुरुवात केली आहे. तर, यंदाही या २ संघातील सामन्यानेच आयपीएलची सुरुवात होणार आहे. अर्थात या २ संघांना एकमेकांविरुद्ध तब्बल ४ वेळा आयपीएलचा पहिला सामना खेळण्याचे सौभाग्य लाभणार आहे.
त्यांच्याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या २ संघांनी आयपीएलच्या इतिहासात एकमेकांविरुद्ध २ वेळा पहिला सामना खेळला आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये झालेले पहिले सामने –
२०२०- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२०१९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१८- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१७- सनराइजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१६- मुंबई इंडियन्स विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स
२०१५- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१४- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१३- दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१२- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०११- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१०- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स
२००९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२००८- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
महत्त्वाचे बातम्या –
जोस बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने असे केले ऑस्ट्रेलियाला पराभूत
रैनाला कितीही वाटले तरी आता कमबॅक करु शकणार नाही, पहा कोण म्हणतेय हे
जर का ती गोष्ट घडली तर सुनिल नरेनविरुद्ध आयपीएलमध्ये खेळणे होणे महाकठीण
ट्रेंडिंग लेख –
कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज
क्रिकेट मंडळाशी वाद पडला भारी, या ५ दिग्गज खेळाडूंची संपली कारकीर्द
फलंदाजांनो तयार रहा, ‘हे’ ३ भारतीय गोलंदाज आयपीएलच्या एका डावात उडवू शकतात ५ फलंदाजांची दांडी