ऑस्ट्रेलिया आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अनुभवी खेळाडू शेन वॉटसनने आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वॉटसनने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघाव्यतिरिक्त वॉटसनने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थानला विजेतेपद जिंकून देण्यात वॉटसनने मोलाची भूमिका बजावली होती.
निवृत्तीबाबत संघसहकाऱ्यांना सांगितले
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटसनने कोणत्याही क्रिकेट प्रकारात खेळणार नसल्याचे आपल्या संघसहकाऱ्यांना सांगितले. म्हणजेच तो आता पुढील वर्षी चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार नाही.
“आयपीएल २०२०चा शेवटचा साखळी सामना संपल्यानंतर आपण निवृत्ती घेणार असल्याचे त्याने आपल्या संघसहकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी वॉटसन खूपच भावुक झाला होता. तो म्हणाला की, चेन्नईसाठी खेळणे हे माझ्यासाठी खूप चांगले होते,” असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून टाईम्स ऑफ इंडियाने सांगितले.
आयपीएल २०२०मध्ये केली खराब कामगिरी
आयपीएल २०२०मध्ये चेन्नईने आपल्या खराब कामगिरी सर्वांनाच निराश केले. आतापर्यंत आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडले, जेव्हा चेन्नई संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
वॉटसनने या हंगामात खराब कामगिरी केली. त्याने एकूण ११ सामने खेळले. त्यात त्याने २९९ धावाच केल्या. या धावा करताना त्याने केवळ २ अर्धशतके केली. प्रत्येक हंगामात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वॉटसनला या हंगामात फार काही चांगली कामगिरी करता आली नाही.
त्याने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत १४५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३०.९९ च्या सरासरीने ३८७४ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे
कारकीर्द
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ५९ कसोटी, १९० वनडे आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३५.१९ च्या सरासरीने ३७३१ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ४०.५४ च्या सरासरीने ५७५७ धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने १९.२४ च्या सरासरीने १४६२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-“भारताच्या ‘या’ राज्यात बनेल एमएस धोनीचे मंदीर,” माजी क्रिकेटरचे मोठे विधान
-“शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या”, असे का म्हणाला एमएस धोनी, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ






