fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज रंगणार बेंगलोर विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या ‘या’ सामन्याबद्दल सर्वकाही

September 24, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा सहावा सामना आज(24 सप्टेंबर) दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. हा सामना दुबईमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.

गेल्या या दोन संघातील मागील 4 सामन्यात बेंगलोरने पंजाबचा पराभव केला आहे. त्याचवेळी दुबईमध्ये दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, त्यात पंजाबचा विजय झाला आहे. या हंगामात पंजाबने आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळला, जो दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्याचवेळी बेंगलोरने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले.

गेल-राहुल-मॅक्सवेल यांच्यावर आहे पंजाबची जबाबदारी

सर्वात अनुभवी अनुभवी ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार केएल राहुलच्या खांद्यावर पंजाब संघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. गेलने लीगच्या इतिहासात सर्वाधिक 326 षटकार आणि सर्वाधिक 6 शतके ठोकली आहेत. गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी आणि शेल्डन कॅट्रेल हे देखील संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली

आयपीएलमध्ये सर्वाधिक 5412 धावा करणाऱ्या विराट कोहलीसह आरसीबीमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि ऍरॉन फिंचसारखे दिग्गज फलंदाज आहेत.  या संघात अष्टपैलू खेळाडूंमध्ये ख्रिस मॉरिस, मोईन अली आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत. गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल व्यतिरिक्त उमेश यादव आणि नवदीप सैनी सारखे धुरंधर आरसीबीच्या गटात आहेत.

देवदत्त पडिकक्कल आणि रवि बिश्नोईवर आहेत सार्‍यांच्या नजरा

मागील सामन्यात आरसीबीने ऍरॉन फिंचसह युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल याला संधी दिली. पडिक्क्कलने टीम मॅनेजमेंटला निराश केले नाही आणि पदार्पण सामन्यात त्याने शानदार अर्धशतक केले. तसेच दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 षटकांत केवळ 22 धावा देऊन एक बळी घेणारा पंजाबच्या फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईवरही सर्वांची नजर असेल.

या दोन विक्रमावर असेल नजर

या सामन्यात 2 धावा केल्याबरोबर पंजाबचा कर्णधार केएल राहुल आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण करेल. तसेच आरसीबीचा डेल स्टेन हा 3 बळी घेताच आयपीएलमध्ये 100 गडी बाद करणारा 15 वा गोलंदाज असेल.

आमने-सामने – 

आयपीएलमध्ये पंजाब आणि आरसीबी यांच्यातील लढाई बरोबरीची राहिली आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये 24 सामने खेळले गेले आहेत. दोघांनीही 12-12 सामने जिंकले आहेत. पण गेल्या दोन हंगामात पंजाबला आरसीबीविरुद्ध विजय मिळवता आला नाही.

खेळपट्टी आणि हवामान अहवाल

दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ होईल. तापमान 27 ते 41 डिग्री सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे.  खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते.  येथे स्लो विकेट असल्याने फिरकीपटूंनाही खूप मदत होईल.  नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.  या आयपीएलपूर्वी, शेवटच्या टी -20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाचा यश दर 55. 74% होता. मात्र यावेळी पंजाब आणि दिल्लीचा सामना याच मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. पण सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

या मैदानावर एकूण टी 20 सामने: 61

प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला: 34 वेळा

प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला: 26 वेळा

पहिल्या डावात सरासरी संघाची धावसंख्या: 144

दुसर्‍या डावात संघाची सरासरी धावसंख्या: 122

आरसीबीच्या विजयाची सरासरी पंजाबपेक्षा जास्त

आयपीएलमध्ये आरसीबीच्या विजयाची टक्केवारी 47.75% आहे.  त्याने आतापर्यंत लीगमध्ये 182 सामने खेळले असून 87 सामने जिंकले आहेत आणि 95 गमावले आहेत.  त्याच वेळी 4 सामने अनिर्णीत होते. दुसरीकडे, पंजाबचा पंजाबचा यश दर 46.04% आहे. पंजाबने आतापर्यंत 177 सामने खेळले असून 82 विजय आणि 95 गमावले आहेत.

आरसीबी आणि पंजाब दोघांनाही जेतेपद मिळवता आले नाही

2009 मध्ये अनिल कुंबळे आणि 2011 मध्ये डॅनियल व्हेटोरी यांच्या नेतृत्वात आरसीबीने अंतिम सामना खेळला. 2016 मध्ये विराटच्या नेतृत्वाखालीही संघाने अंतिम फेरी गाठली होती.  पण प्रत्येक वेळी संघाचे नशीब वाईट होते. 2014 मध्ये पंजाबने अंतिम सामना खेळला होता. त्यांना कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला.


Previous Post

श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….

Next Post

दहा कोटींना खरेदी केलेला आरसीबीचा ‘हा’ शिलेदार दुसऱ्या सामन्याला देखील मुकणार?

Related Posts

Photo Courtesy: Instagram/@sakshisingh_r/@ziva-singh_dhoni
Covid19

धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली…

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Next Post

दहा कोटींना खरेदी केलेला आरसीबीचा 'हा' शिलेदार दुसऱ्या सामन्याला देखील मुकणार?

रोहित शर्माने तोडला धोनीचा 'हा' विक्रम, आता गेल, डिविलियर्सच्या विक्रमावर आहे नजर

सूर्यकुमार यादव 'अशी' कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा ठरला सातवा खेळाडू

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.