आयपीएल 2025 मधील 20वा सामना आज (07 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो हंगामातील चार सामन्यांना मुकला आहे. पण आज मात्र बुम-बुम अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
चालू हंगामात मुंबईने चार सामने खेळले आहेत. ज्यातील तीन सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. संघाने कोलकाता विरुद्ध एक सामना जिंकला. आरसीबीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी हंगामात तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 2 सामन्यांत संघाने विजय मिळवला आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांचा पराभव झाला आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
मुंबई- विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर
बंगळुरु- फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल
जर आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले आहेत ज्यात मुंबईने 19 सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. तर आरसीबीने मुंबईविरुद्ध 14 विजय मिळवले आहेत.






