---Advertisement---

चांगल्या दिवसांची वाट पाहणार की.., आकाश चोप्राने संजू सॅमसनला केलं ट्रोल; नेमकं काय म्हणाले?

On: शनिवार, जानेवारी 31, 2026 9:04 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने संजू सॅमसनकडून सलामी (Opening) करून घ्यावी की नाही? या प्रश्नाने सध्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यातही संजूचा खराब फॉर्म कायम राहिला, जिथे तो केवळ 6 धावा काढून बाद झाला. याच दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी संजूला ट्रोल केले आहे.

तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या टी-20 सामन्यात समालोचन (Commentary) करताना आकाश चोप्रा यांनी संजूची तुलना ईशान किशनशी (Ishaan kishan) केली. ते म्हणाले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशनची निवड करणे भारतीय संघासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

आकाश चोप्रा म्हणाले, तुम्ही ‘चांगले दिवस’ येण्याची वाट पाहणार की अशा खेळाडूला खेळवणार ज्याचे सध्या ‘चांगले दिवस’ सुरू आहेत? ईशान किशनचे सध्या चांगले दिवस सुरू आहेत.

जानेवारी 2025 पासून आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये संजू सॅमसन 10 वेळा पॉवरप्ले संपण्यापूर्वीच बाद झाला आहे. गेल्या वर्षभरात तो 14 पैकी 10 डावांत पॉवरप्ले संपेपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकलेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक (Fifty) आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचही सामन्यांत संजूने सलामी दिली, पण त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. 5 सामन्यांत केवळ 46 धावा (सरासरी 9.2). त्याची सर्वोच्च धावसंख्या 24 होती. दुसरीकडे ईशान किशनची बॅट चांगलीच तळपत आहे. त्याने चौथा सामना खेळला नव्हता, तरीही सुरुवातीच्या 3 सामन्यांत 112 धावा केल्या. या मालिकेत पहिल्या 3 डावांत त्याचा स्ट्राइक रेट 224 इतका तुफानी होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---