fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इतिहासात मुंबई- चेन्नई चौथ्यांदा खेळणार सलामीला, जाणून घ्या कोण कोणावर ठरले भारी

September 7, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएल 2020 च्या 13 व्या हंग‍ामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही लीग 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाणार आहे. लीगचा उद्घाटन सामना आयपीएलमधील दोन सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.  एमएस धोनीच्या सीएसकेने तीन वेळा जेतेपद जिंकले तर रोहित शर्माचा कर्णधार संघ मुंबई इंडियन्सने चार वेळा जेतेपद जिंकले.  19 सप्टेंबरला अबुधाबीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील.

आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सलामीचे सामने खेळतील. यापूर्वी 2009, 2012 आणि 2018 मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन दोन्ही संघांच्या सामन्याने झाले. उद्घाटन सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा नेहमीच एमएस धोनीवर वर्चस्व गाजवत असतो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सुरुवातीच्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

2009:  केपटाऊनमध्ये 2009 साली खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसर्‍या हंगामातील सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नईवर 19 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित षटकांत सात गडी गमावून 165 धावा केल्या. यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नाबाद 59 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरात चेन्नईला निर्धारित षटकांत 146 धावा करता आल्या. लसिथ मलिंगाने 15 धावा देत तीन गडी बाद केले.

2012:  चेन्नईत आयपीएलच्या 5व्या हंगामाच्या उद्घाटन सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले. यावेळी मुंबईने चेन्नईवर 8 विकेटने मोठा विजय मिळविला.  प्रथम फलंदाजी करताना चेन्नई 112 धावांवर बाद झाली.  प्रत्युत्तरादाखल मुंबईने 2 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.  मुंबईकडून रिचर्ड लेव्हीने सर्वाधिक 50 धावा केल्या.

2018: आयपीएलच्या 11 व्या हंगामाचा उद्घाटन सामना दोन्ही संघांमध्ये मुंबईत रंगला. जिथे चेन्नईने या पराभवाचा सिलसिला मोडीत काढला आणि 1 गडी राखून सामना जिंकला.  निर्धारित षटकांत मुंबईने 165 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात चेन्नईने एक चेंडू आणि नऊ गडी राखून दिले. ड्वेन ब्राव्होने 30 चेंडूंत 68 धावा केल्या.

आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईचा संघ भारी ठरला होता.  मुंबई इंडियन्सने एकूण 18 सामने जिंकले, तर चेन्नईने 12 सामने जिंकले. या दोघांनी तटस्थ ठिकाणी 5-5 सामने जिंकले.

आयपीएलमधील काही विक्रम-

मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईटरायडर्स आजपर्यंत स्पर्धेचा पहिला सामना प्रत्येकी ६ वेळा खेळले आहेत. मुंबईने ६मधील २ तर कोलकाताने ५ सामने जिंकले आहेत.

आयपीएलमधील ओरिजनल ८ संघातील फक्त पंजाब व राजस्थान संघ स्पर्धेचा पहिला सामना १३ वर्षांत कधीही खेळले नाहीत.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ ६ वेळा जिंकला आहे व ६ वेळा पराभूत झाला आहे.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ४ वेळा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व यात संघाला २ विजय व २ पराभव पहायला लागले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सीएसकेने ४ वेळा नाणेफेक जिंकली आहे. सलग तीन वर्ष सलग नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम कोलकाता (२०१३, २०१४, २०१५) साली केला आहे.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ४ वेळा परदेशी कर्णधार संघाचे नेतृत्त्व करताना दिसले. ऍडम गिलख्रिस्ट (दिल्ली, २०१०), माहेला जयवर्धने (दिल्ली, २०१३), डेविड वॉर्नर (हैद्राबाद, २०१७), शेन वॉटसन (आयपीएल, २०१७)

हंगामातील पहिल्याच सामन्यात शतक करणारे फलंदाज
१६०- रोहित शर्मा
१५८- ब्रेंडन मॅक्क्युलम
१५७- जॅक कॅलिस
१३८- अंबाती रायडू
१०४- मनिष पांडे


Previous Post

जोक नाही! ८ वर्षात पहिल्यांदा डेविड वॉर्नर झालाय शुन्यावर बाद

Next Post

जर का ती गोष्ट घडली तर सुनिल नरेनविरुद्ध आयपीएलमध्ये खेळणे होणे महाकठीण

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

जर का ती गोष्ट घडली तर सुनिल नरेनविरुद्ध आयपीएलमध्ये खेळणे होणे महाकठीण

कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज

रैनाला कितीही वाटले तरी आता कमबॅक करु शकणार नाही, पहा कोण म्हणतेय हे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.